Pissurlem Electricity Issue: महिनाभर वीजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त
Electricity Bill Dainik Gomantak
गोवा

Electricity Bill: नागरिकांचा वीज बिले न भरण्याचा इशारा! भुईपाल, पिसुर्ले येथील ग्रामस्थ हैराण

गोमन्तक डिजिटल टीम

गेला महिनाभर भुईपाल, पिसुर्ले परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तातडीने उपाय न योजल्यास वीज बिले न भरण्याचा इरादा ग्राहकांनी व्यक्त केला आहे.

विजेचा लपंडावामुळे विद्यार्थी, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त फटका बसतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणावी अशी मागणी सरपंच देवानंद परब यांनी केली आहे.

वाळपईतीव वीज वितरण केंद्रावरून पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील भुईपाल तसेच कुंभारखण, अडवई, पिसुर्ले आदी भागात वीज पुरवठा केला जातो.

बिले मात्र भरमसाट, सरपंच

पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब यांनी सांगितले की, पावसाळा सुरु झाल्यापासून या भागात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यात गेल्या महिनाभरापासून वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांच्या संताप अधिक भर पडली आहे. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास बिले न भरण्याचा इरादा ग्राहक बोलून दाखवत आहेत. खात्याने याची वेळीच दखल घ्यावी.

केबलला दोष

वाळपई वीज पुरवठा विभागाचे अभियंते गावस यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपूर्वी घातलेल्या केबलमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ठिकठिकाणी केबल्स शॉर्ट होत असल्याने पुरवठा सुरळीत होत नाही. तरीही वेळीच दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत करण्यात येतो, असे ते म्हणाले.

रामा ताटे, भेडशेवाडा, भुईपाल

वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करता येत नाही, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होत आहे.यांची दखल सरकारने घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.

तोडगा निघणार

भुईपाल भागातील वीज समस्येबाबत आमदार डॉ. दिव्या राणे यांना वारंवार कल्पना दिली आहे. त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सध्या वीज पुरवठ्यात सुधारणा दिसून येत आहे. मात्र यावर कायमचा तोडगा आवश्‍यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT