Goa Electricity Department: वीज ग्राहकांना ‘शॉक’

Goa Government: प्रमाणाहून जादा वीज वापर भोवणार; वीज चोरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Goa Government: प्रमाणाहून जादा वीज वापर भोवणार; वीज चोरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Goa Today's Live News | Goa ElectricityDainik Gomantak

वीज दरवाढीच्या धक्क्यातून सर्वसामान्य वीज ग्राहक अद्याप सावरले नसताना आता वीज खाते ग्राहकांकडून दंड आकारण्यास निघाले आहे. वीज जोडणी घेताना किती वीज लागेल, असे वीज ग्राहकाने अर्जावर लिहून दिले होते, आता तो प्रत्यक्षात किती वीज वापरतो, याची पाहणी केली जाणार आहे.

पूर्वी दिलेल्या माहितीपेक्षा जास्त वीज वापर असल्यास ग्राहकाला ती नोंद सुधारणांसह दंडालाही सामोरे जावे लागणार आहे. येत्या अधिवेशनापूर्वी हा नवा दंडाचा ‘शॉक’ ग्राहकांना बसणार आहे.

वीज दर वाढवले गेल्यानंतर आता या महिन्यांच्या अखेरीस वाढीव दराने वीज बिले येणार असल्याने वीज ग्राहक वीज बिल किती रकमेने वाढून येते याचा विचार करून धास्तावले आहेत. त्यातच या पाहणीत आता किती दंड भरावा लागेल, ही काळजी त्यांना पुढील महिन्यापासून पोखरणार आहे.

Goa Government: प्रमाणाहून जादा वीज वापर भोवणार; वीज चोरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Light Bill Scam : गैरहजर संशयितांविरोधात वॉरंट : वीज बील घोटाळा

वीज जोड घेताना वीज ग्राहकाला एक टेस्ट रिपोर्ट द्यावा लागतो. घराच्या वायरिंगचे काम ज्या व्यक्तीला दिले आहे तीच व्यक्ती ही सारी प्रक्रीया करते. घर मालक केवळ सही कऱण्यापूरता मर्यादीत असतो.

वीज खात्याची तांत्रिक भाषा त्याला समजत नाही. किती वीज लागणार हेही त्याला सांगता येत नसते. त्यामुळे वायरींगचा कंत्राटदारच जे काही अर्जात भरेल त्यावर तो स्वाक्षरी करतो. अनेकदा वीज खात्याने स्थिर आकार जास्त आकारू नये यासाठी घरात १० ठिकाणी वीज वापर होत असेल तर तो वापर ६ ठिकाणीच आहे, असे दाखवण्यात येते.

वीज ग्राहक आपले घर बांधून झाल्यावर फक्त वीज जोड मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करून असतो. तो या तपशीलात जात नाही. वीज जोड मिळाल्यावर नंतर बिल भरण्यापूरता किंवा काही बिघाड झाला तरच वीज ग्राहकाचा वीज खात्याशी संबंध येतो.

ग्राहकाकडून चुकीची माहिती दिली गेल्याने वीज वितरणाचे नियोजन करणे, वीज संवाहक कोणत्या भागात हवा याचे नियोजन करणे वीज खात्याला कठीण होते. विजेच्या दाबाचा अंदाज लावणे त्यांना त्यामुळे त्यांना जमत नाही. यासाठी ही पाहणी करण्यात येणार आहे.

वीज वितरणात सुसुत्रता निर्माण करण्याच्या हेतूने ही पाहणी होणार असली तरी वीज जोड घेतेवेळी दिलेल्या माहितीपेक्षा जास्त विजेची मागणी ग्राहकाकडून केली जात असल्याचे दिसून आल्यास त्यांनी वीज खात्याच्या नियमानुसार दंडास सामोरे जावे लागणार आहे.

Goa Government: प्रमाणाहून जादा वीज वापर भोवणार; वीज चोरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Electricity Price Hike: वीज दरवाढीवरुन विरोधक आक्रमक; सत्ताधाऱ्यांचाही फेरविचाराचा सल्ला

वीज चोरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या पाहणीच्या माहितीस दुजोरा दिला आहे. वाढीव वीज मागणीमुळे वीज दाबात होणाऱ्या चढउतारावर मार्ग काढण्यासाठी नेमका किती वीज दाब अमूक भागात हवा, हे निश्चित करावे लागणार आहे.

यासाठी वीज ग्राहक वीज किती व कशासाठी वापरतात याची माहिती संकलित करावी लागणार आहे. राज्यभरातील वीज ग्राहकांच्या ठिकाणी जाऊन ही पाहणी करावी लागणार आहे त्‍यामुळे ही मोठी गोष्ट आहे, तरीही ती करावी लागणार आहे.

वीज खात्याने मोपा येथील बंगल्याची पाहणी केल्यावर अवैधरीत्या वीज वापरली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याबद्दल लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्या कारणासाठी वीज जोडणी घेण्यात आली आहे, त्याच कारणासाठीच वीज वापरली गेली पाहिजे. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com