Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Sattari News: सत्तरी, वाळपई भागात वीज पुरवठा खंडीत; आमोणातील 33 केव्ही वीजवाहीनी तारांवर पडले झाड

दाबोस पाणी प्रकल्पात वीज खंडीत, पाणी टंचाई जाणवणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Sattari Power Cut: : सत्तरी तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या आमोणा येथील 33 केव्ही वीज वाहिनीवर झाड पडल्यामुळे सत्तरी तालुक्यात बत्ती गुल झाली आहे. दरम्यान, फणसवाडी नावेली येथे वीजेच्या तारांवर गुलमोहराचे झाड पडल्याने त्याचा परिणाम वाळपई उपकेंद्रावर झाला आहे. त्यामुळे वाळपई भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

दरम्यान, वीजतारांवरील हे झाड हटविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि वीज खात्याचे कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्या काही दिवसात गोव्यात पावसाने जोर धरला आहे. या काळात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दुपारी अडीच वाजल्यापासून दाबोस पाणी प्रकल्पावरील वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रकल्पातील काम थांबले आहे.

त्यामुळे या भागात पुढील दोन दिवस संबंधित भागांमध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT