Digambar Kamat, Divya Rane  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: वीजदर वाढले आता सुविधाही द्या; दिगंबर कामत यांनी सुनावले

Goa Electricity: सत्तरीत सर्व्हे करून स्टाफ वाढवावा; डॉ. दिव्‍या राणे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पाच वर्षांत विजेचा दर तीन पटीने वाढविला आहे. या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर होतोय. दर वाढल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत व्‍हावा किंवा त्यात सुलभता यावे अशी लोकांची अपेक्षा असते. वीजमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केली.

वीज खात्याने विशेष अकाऊंट्‌स उघडावीत. हे आपण सतत सांगत आलो आहे. ग्रामीण भागात पाच लाखांवर ग्राहक आहेत. विजेचा दर वाढवला की त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. दर वाढवितात त्याप्रमाणे जनतेला सुविधाही मिळणे आवश्यक आहे, असे कामत म्‍हणाले.

पथदीपांची संख्या वाढली आहे. राज्यात सर्वत्र भूमिगत वीजवाहिन्‍यांचे काम सुरू आहे. केबलचा दर्जा आणि कामांकडे लक्ष दिले पाहिजे. भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीचे काम करण्‍यासाठी त्रयस्थ कंपनी नेमावी. मडगाव इनडोअर स्टेडियमवर उपकेंद्र झाल्यास नावेली, बाणावली गावांना त्याचा फायदा होईल, असेही कामत म्‍हणाले.

सरकारी वसाहतींवर उभारा सौरऊर्जा पॅनल

अनेक ठिकाणी वीजखांब खराब झालेले आहेत. ते तत्काळ हटवावेत. अक्षयऊर्जेसाठी लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सरकारी वसाहतींवर सौरऊर्जेचा पॅनल उभारावे, म्हणजे लोकांमध्ये जागृती होईल. त्यानंतर हॉटेल्‍स किंवा इतर इमारतींवर पॅनल बसवावेत. मग सवलत देऊन ग्रामीण लोकांना सौरऊर्जा पॅनल बसविण्यासाठी आवाहन करता येईल, अशी सूचना दिगंबर कामत यांनी केली.

सत्तरीत चार-चार दिवस नसतो विजेचा पत्ता; लोकांची गैरसोय

वीज कार्यालयात बसून राहणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना कामाला लावले पाहिजे. भिरोंडा, सालेली येथे भूमिगत वीजवाहिनीचे काम अपूर्ण आहे, ते पूर्ण करावे. मुसळधार पावसामुळे सत्तरीतील वीज आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. चार-चार दिवस वीज नसते, असे पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी सभागृहात सांगितले.

वीज खात्याच्या अधिकाऱ्यांमुळे सत्तरीत बऱ्याच ठिकाणची वीज समस्या सुटली आहे. पर्ये मतदारसंघात काही ठिकाणी भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण झालेले आहे. वाळपई उपकेंद्राअंतर्गत भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम केले आहे. अनेक गावे जंगलांत, डोंगरावर आहेत. तेथेही भू-वीजवाहिन्‍या टाकल्‍या आहेत, असे राणे म्‍हणाल्‍या.

सत्तरीत अनेक दिवस वीज गायब असते. त्‍यामुळे आमोणा ते वाळपई उपकेंद्राकडे येणारी ओव्हरहेड एचटी वाहिनी भूमिगत करावी. येथील कर्मचाऱ्यांची संख्या मागील २० वर्षांच्या लोकसंख्येनुसार आहे. त्यामुळे सर्व्हे करून स्टाफ वाढवावा.
डॉ. दिव्या राणे, आमदार (पर्ये)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT