Electricity Problem Dainik Gomantak
गोवा

Electricity Problem : हरमल पंचायत क्षेत्रात विजेचा खेळखंडोबा

Electricity Problem : दिवसा आठ ते दहावेळी वीज गायब

दैनिक गोमन्तक

Electricity Problem : वीज खाते शट डाऊन घोषित करते, मात्र त्याचा पता येथील वीज कर्मचाऱ्यांना नसतो. त्यांच्याशी संपर्क केल्यास, शट डाऊन नाही, असे उत्तर दिले जाते. हे ऐकून अनेक ग्राहकांनी आश्चर्य व्यक्त केले. मागील दोन दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने येथील ग्राहकांत प्रचंड नाराजी पसरलेली आहे.

वीज खात्यात सध्या अनागोंदी कारभार चालू आहे. गेले अनेक महिने वीज गुल होण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारी सकाळपासून आठ ते दहा वेळा वीज गुल झाली. तसेच रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वारा पाऊस नसतानाही अचानक वीज गुल झाली. तब्बल दीड तासाने पुरवठा सुरळीत झाला. याबाबत येथील अमनदीप नाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. वीज खात्यातील अनागोंदी कारभाराचे सामान्य ग्राहक बळी ठरत असल्याचे नाईक म्हणाले.

वीज खाते शट डाऊन जाहीर करते, मात्र याची कल्पना स्थानिक कर्मचाऱ्यांना नसते. मग हे शट डाऊन नेमके कोणासाठी केले जाते, असा प्रश्‍न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. दिवसा होत असलेले शट डाऊनचे प्रकार रात्रीच्या वेळेत असह्य वाटू लागतात, असे गृहिणी श्वेता नाईक यांनी सांगितले.

नवे सब स्टेशन

मांद्रे मतदारसंघातील आठ पंचायत क्षेत्रातील ग्राहकांसाठी नवीन सब स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू असून सब स्टेशन कार्यान्वित झाले की वीज पुरवठ्यात सुधारणा होईल, असा आशावाद वीज खाते व आमदार जीत आरोलकर यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे कधी एकदा हे सब स्टेशन सुरू होते याकडे नागरिकांचे नजर लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT