Goa Taxi App: मोजक्या टॅक्सीचालकांमुळेच गोवा बदनाम

Goa Taxi App: रोहन खंवटे : ‘गोवा टॅक्सी ॲप’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण
Goa Taxi App
Goa Taxi AppDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi App: राज्यातील काही टॅक्सीचालकांमुळेच गोव्याची बदनामी होत असून गोव्याला देशाची पर्यटन राजधानी बनवायची असल्यास पर्यटक आणि स्थानिकांना चांगला प्रकारच्या साधन सुविधा दिल्या पाहिजेत,असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

Goa Taxi App
Goa Unity Mall: ‘युनिटी मॉल’मुळे खारफुटी धोक्‍यात !

टॅक्सी ॲप हे नवीन तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे अनिवार्य झाले आहे. हे नवे तंत्रज्ञान स्वीकारले तरच भावी पिढीसाठी हा व्यवसाय टिकेल, असेही खंवटे यांनी सांगितले. रखडलेल्या आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गोवा टॅक्सी ॲपचे अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, पर्यटन सचिव संजय गोयल, पर्यटन संचालक सुनील अंपाचिका उपस्थित होते.

Goa Taxi App
Girish Chodankar: जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा
  • टॅक्सीचालकांसाठी लाभदायी योजना

  • या ॲपशी संलग्न टॅक्सीचालकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.

  • भाड्यामधील ९० टक्के पैसे संबंधित टॅक्सीचालकाला तातडीने मिळणार.

  • पाच टक्के रक्कम टॅक्सीचालकांच्या असोसिएशनला देण्यात येतील.

  • ५ टक्के रक्कम ॲप चालवणाऱ्या कंपनीला देण्यात येतील.

  • ५ टक्क्यांमध्ये टॅक्सीचालक असोसिएशनतर्फे विविध उपक्रम राबवणार.

  • विधवा योजना, पेन्शन योजना, लग्नासाठी आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती.

500 टॅक्सी ऑपरेटर ‘ॲप’वर

हे ॲप गेल्या ६ महिन्यांपासून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी काउंटरवर कार्यरत आहे. ५०० हून अधिक टॅक्सी ऑपरेटर आधीच या ॲप आधारित सेवेत सहभागी झाले आहेत. उरलेल्या टॅक्सी व्यावसायिकांनीही या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटनमंत्री खंवटे यांनी केले आहे.

अबब...विमान व टॅक्सी खर्च सारखाच

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला चांगल्या पर्यटकांची गरज आहे. जर चांगले पर्यटक यायचे असतील तर त्याच पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणे क्रमप्राप्त आहे. दिल्लीतून गोव्यात विमानाने येण्याचा खर्च आणि विमानतळावरून गोव्यातच पर्यटकांना हव्या त्या ठिकाणी जाण्याचा खर्च जर समान येत असेल तर तो पर्यटक पुन्हा गोव्यात येताना दहादा विचार करेल, हे थांबायला हवे. म्हणूनच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सर्वांनी टॅक्सी ॲप स्वीकारले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com