Goa Drug Case: ‘ड्रग्ज’प्रकरणी गोवा-महाराष्ट्र सीमेवरील ‘सासोली’ रडारवर

Goa Drug Case: गोव्यात अंमलीपदार्थांची तस्करी महाराष्ट्राच्या सीमेवरील सासोली गावातून होत असल्याचा संशय अंमलीपदार्थ विरोधी तपास यंत्रणेला आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Drug Case: गोव्यात अंमलीपदार्थांची तस्करी महाराष्ट्राच्या सीमेवरील सासोली गावातून होत असल्याचा संशय अंमलीपदार्थ विरोधी तपास यंत्रणेला आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 15 मिनिटांच्या अंतरावर समुद्रकिनारी भागात अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या धेंडांनी मालमत्ता खरेदी केल्याचीही माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.

Goa Drug Case
Goa Taxi App: मोजक्या टॅक्सीचालकांमुळेच गोवा बदनाम

नुकत्याच झालेल्या आंतरराज्य पोलिस उच्चस्तरीय बैठकीत ही बाब चर्चेत आली. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राज्यातील पोलिस प्रशासनाने सीमेवर करडी नजर ठेवण्याच्याही मुद्द्यावर चर्चा झाली. पोलिस यंत्रणांनी माहितीचे आदानप्रदान करावे, यावरही चर्चा झाली.

विदेशींकडून मोठी गुंतवणूक

गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील 2000 लोकवस्तीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सासोली हा गाव अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या रडारवर आले आहे. इस्त्रायली, नायजेरीयन तसेच जर्मन,रशियनांनी सासोलीलगत मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी केल्याचे आढळून आले आहे.

ड्रग्ज वितरणासाठी डिझायनर पार्टीच्या आयोजनाचा मनसुबा या ड्रग्ज पेडलर्सचा असल्याचाही वहीम आहे. एलएसडी, एस्कॅटसी, कोकेन आदी प्रकारच्या अंमलीपदार्थांची तस्करी करण्याचे केंद्र म्हणून सासोली गाव पुढे येत असल्याचाही तपास यंत्रणांना संशय आहे.यापार्श्‍वभूमीवर नार्कोटीक्स विभागाच्या पोलिसांनी सासोलीवर नजर ठेवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Mapusa Kidnapping Cases 2026
Goa Police Srinivas Naik Investigation
Srinivas Naik Shooting Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com