Kashinath Shetye Crime Branch Complaint Dainik Gomantak
गोवा

Goa Police Corruption: पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची तक्रार; खोटा गुन्हा दाखल करण्याचाही केला प्रयत्न

Kashinath Shetye Crime Branch Complaint: विद्युत विभागाचे नोडल अधिकारी, भू-संपादन व कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी स्थानिक योगेश तिगाडी, पोलिस उपनिरीक्षक संकेत पोकरे आणि पोलिस निरीक्षक गौरीश मळीक यांच्याविरोधात गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: विद्युत विभागाचे नोडल अधिकारी, भू-संपादन व कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी स्थानिक योगेश तिगाडी, पोलिस उपनिरीक्षक संकेत पोकरे आणि पोलिस निरीक्षक गौरीश मळीक यांच्याविरोधात गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. गुन्हेगारी कट रचणे, भ्रष्टाचार करणे तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला तसेच सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोपही शेट्ये यांनी केला आहे.दरम्यान, शेट्ये यांनी मुंबई उच्च न्यायालया च्या गोवा खंडपीठात दोन जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

तक्रारीनुसार, योगेश तिगाडी याने इनासियो डॉम्निक परेरा यांच्यामार्फत याचिका मागे घेण्यासाठी तक्रारदाराला १५ लाख रुपयांच्या लाचेची ऑफर दिली होती. ही ऑफर नाकारल्यास पोलिस उपनिरीक्षक संकेत पोकरे आणि पोलिस निरीक्षक गौरीश मळीक यांच्या मदतीने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT