Bad Roads In Parra Constituency Dainik Gomantak
गोवा

Parra Constituency: खोदकाम करून वीजवाहिनी टाकली; रस्ते दुरुस्ती कधी?

Goa Electricity Department: केरी, मोर्ले व पर्ये आदी ग्रामपंचायत क्षेत्रात खोदकाम करून वीजवाहिन्या टाकल्या पण त्यानंतर खोदकाम केलेले रस्ते दुरुस्त केले नाहीत

गोमन्तक डिजिटल टीम

वीज खात्यातर्फे पर्ये मतदारसंघातील केरी, मोर्ले व पर्ये आदी ग्रामपंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकाम करून वीजवाहिन्या टाकल्या; पण त्यानंतर खोदकाम केलेले रस्ते दुरुस्त केले नाहीत. केवळ मातीचा भराव टाकून तात्पुरती डागडुजी केली. त्यामुळे आता पावसाळ्यात खोदकाम केलेल्या ठिकाणी माती वाहून जाऊन चर पडल्याने ते वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत.

मोर्ले-सत्तरी येथे हल्लीच अशा रस्त्यावर ट्रक रुतले होते. तर या रस्त्यांमुळे या भागात लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे सरकारद्वारे केलेले हे काम वाहनचालकाच्या जीवावर बेतल्याचे दिसत आहे. तेव्हा संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन हे खोदलेले रस्ते पूर्णपणे दुरुस्त करून त्यावर डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या भागातील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित यंत्रणेला जाब विचारून धोकादायक बनत असलेले हे रस्ते दुरुस्ती करायला हवे होते; पण या भागातील लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे डोळेझाक केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम वीज खात्यातर्फे केले होते. मात्र, वीज खाते रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाची जबाबदारी आहे, असे सांगते. हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या दोन्ही खात्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT