Electrical equipment  Dainik Gomantak
गोवा

मुसळधार पावसामुळे गोव्यातील वीज उपकरणांचे नुकसान; युद्धपातळीवर काम सुरू

मांद्रे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर राज्याच्या इतर भागात हलका पाऊस झाला.

दैनिक गोमन्तक

पणजी: पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून वीज विभागाकडून मान्सूनपूर्वी विजेची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात बत्ती गुल झाली. (electrical equipment damaged due to heavy rain in goa)

मांद्रे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर राज्याच्या इतर भागात हलका पाऊस झाला. मात्र, यामुळे संपूर्ण उत्तर गोवा जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झाला. पर्वरीच्या रहिवाशांनी सांगितले की, त्यांना सुमारे सहा तास अंधारात रहावे लागले.

पेडणे येथील लोकांना देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागला. ते म्हणाले, वीज पुरवठा अद्यापही पूर्ववत झालेला नाही. मंगळवारी सायंकाळपर्यंत तालुक्यातील अनेक घरांमध्ये वीज नसल्याची तक्रार होती.

वीज विभागाच्या म्हणण्यानुसार, सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आणि काही विजेचे खांब कोसळले. वीज विभागाचे मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस म्हणाले, "प्रामुख्याने
डिचोली, साखळी, बाणावली येथील विजेच्या तारा तुटल्या. तांत्रिक समस्येमुळे सोमवारी रात्री दुरुस्तीचे काम होऊ शकले नाही", असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “सकाळपासून युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली आहे. 50% वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंत्यांनी रात्रभर काम केले,” फर्नांडिस यांनी दावा केला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT