प्रचार सभा  Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुक्यात उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात निवडणुकीची (Election) आचार संहिता लागण्याची शक्यता लक्षात घेवून संभाव उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

मोरजी: गोवा (Goa) राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका (Assembly elections) अजून पर्यंत अधिकृत जाहीर झाल्या नाही. मात्र पेडणे मतदार संघातील मांद्रे मधून मगोचे उमेदवार जीत आरोलकर आणि पेडणे मधून मगोचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी प्रचाराचा श्रीफळ देवाला ठेवून सुरुवात केली. तर मिशन फॉर लोकलचे पेडणे मतदार संघातून भाजपाची (BJP) उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्याना आणि कोरगावातील जनतेला एकत्रित आणि कोरगाव येथे शक्ती प्रदर्शन केले. त्याला प्रत्युतर देण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी वझरी गावातील युवकांची एक सभा घेवून आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात निवडणुकीची आचार संहिता (Code of Conduct) लागण्याची शक्यता लक्षात घेवून संभाव उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात करताना नेत्यावर एक प्रकारचा दबाव आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.

पेडणे मतदार संघ

पेडणे मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदार संघाचा विचार केला तर मगोचे देवू मांद्रेकर वगळता आज पर्यंत बाहेरच्या उमेदवारांची मगो, भाजपा (BJP) आणि कॉंग्रेसने (Congress) उमेदवार दिलेले आहे. त्यात बाबू आजगावकर हे तिन्ही पक्षाच्या उमेदवारीवर आमदार बनलेले आहे. हि निवडणूक उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोचणारी ठरणार आहे, ते म्हणतात हि निवडणूक आपली शेवटची निवडणूक या पुढे आपण निवडणूक लढवणार नाही. असे जाहीर केले.

तर दुसऱ्या बाजूने भाजपाचे जुने कार्यकर्त्ये म्हणतात यावेळी स्थानिक उमेदवार हवा आणि मिशन फॉर लोकलचे (Mission for Local) राजन कोरगावकर याना कार्यकर्त्यांनी समोर करून भाजपला प्रतिआव्हान देण्याची सुरुवात केली आहे. भाजपची उमेदवार हि आपल्यालाच मिळणार असा विश्वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केला आहे.

मिशन फॉर लोकल राजन कोरगावकर

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर हे मूळ कोरगाव गावातील कामानिमिताने ते 2021 साली मडगाव येथे गेले. मागचे वर्षभर त्यांनी मिशन फॉर लोकल तर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले, त्यांनी आजपर्यंत व्ययक्तीकरीत्या कधीही थेट सरकारवर (government) किंवा उपमुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्यावर टीका केली नाही.

मात्र ज्यावेळी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) बाबू आजगावकर यांनी त्याच्या शेपटीवर पाय टाकला त्या दिवसापासून त्यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. कोरगावचे रहिवासी असल्याने अर्ध्याअधिक पंचायत मंडळ आपल्यासोबत वळवण्यास त्याना यश मिळाले आहे. भाजपाचे जुने कार्यकर्त्ये म्हणतात भाजपाने यंदा स्थानिकाला उमेदवारी द्यावी त्या उद्देशाने मिशन फॉर लोकलने शक्तीप्रदर्शन केले आहे.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची शेवटची निवडणूक

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) हे आता पर्यंत चार वेळा या राखीव मतदार संघातून विजयी झाले आहेत. मगो भाजपा कॉंग्रेस या तिन्ही पक्षाच्या तिकिटावर ते विजयी झाले आहेत. त्याना टक्कर देण्यासाठी भाजपाचे जुने कार्यकर्त्ये पुढे सरसावले आहेत. भाजपाची उमेदवारी हि आपल्यालाच मिळणार असा विश्वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त करून हि निवडणूक आपली शेवटची निवडणूक आणि बेरोजगाराना रोजगार मिळवून देणारी निवडणूक असेल असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी जाहीर केले आहे.

मगोचे प्रवीण आर्लेकर

मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी तर निवडणूक लढवण्यापूर्वीच धारगळ येथे स्वताचे घर बांधून रहायला आले, त्यांनी आपले मतदानही याच गावात आणले आहे, गेले दीड वर्षभर ते मतदार संघात विविध उपक्रम राबवून त्यांनी सरकारला घाम आणलेला आहे. विबिध उपक्रमा व्यतिरिक्त त्यांनी नुकतेच कोरगाव येथे शक्तीप्रदर्शन करून प्रचाराचा श्रीफळ ठेवलेला आहे.

मांद्रे मतदार संघ

मांद्रे मतदार संघातून मगोचे जीत आरोलकर यांनी मागच्या चार वर्षापासून आपले कार्य या मतदार संघात चालू आहे, नुकतेच त्यांनी मोरजी येथील श्री मोरजाई देवीला श्री फळ अर्पण करून आपली शक्ती प्रदर्शन केले आहे, विरोधकासमोर जबरदस्त आव्हान त्यांनी उभे केले आहे. एकंदरीत मगोचे जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आदींनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT