आरोग्यदायी पणत्या होत आहेत कालबाह्य

कारिट हे आयुर्वेदीकदृष्टय़ा (Ayurvedic) महत्त्वाचे मानले जाते. रक्ताभिसरणाची क्रिया कारिटाच्या गंधामुळे तीव्र होत असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांचे (Ayurveda specialist) मत आहे.
कारिटांच्या पणत्या
कारिटांच्या पणत्याDainik Gomantak

काणकोण: बाजारात चिनी मातीच्या मेणाच्या व इलेक्ट्रिक पणत्या उपलब्ध आहेत. मात्र पूर्वीच्या काळी कारिट फोडून त्यातील गर काढला जात असे अशा प्रकारे तयार केलेल्या पणतीत तेल वात घालून दिपावलीच्या (Diwali) काळात दिपराधना करण्यात येत होती. देवालयातही कार्तीकी पोर्णीमेला दिपराधनाची आरस करण्यासाठी शेणावर कारिटाच्या पणत्या ठेवून त्यांत तेल वात घालून पेटविण्यात येत होत्या.मंदपणे पाणी पेटणाऱ्या या पणत्या आरोग्यदायी होत्या मात्र काळाच्या ओघात कारिटांच्या पणत्या कालबाह्य ठरल्या आहेत.

कारिट हे आयुर्वेदीकदृष्टय़ा (Ayurvedic) महत्त्वाचे मानले जाते. रक्ताभिसरणाची क्रिया कारिटाच्या गंधामुळे तीव्र होत असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे. कारीट हे असे एक फळ आहे की जे एकदा वेलीपासून तोडून ठेवले तर ते वर्षभर टिकते.

कारिटांच्या पणत्या
गोवा दौऱ्यात राहुल गांधी मच्छिमार बांधवांशी साधणार संवाद भेटणार

लोखंड अथवा कोणत्याही शस्त्राने जखम होऊन आपल्या शरीरावर सूज आली असेल तर कारीट फोडून लावल्यास सूज कमी होते. ग्रामीण भागात (rural areas) आता हातापायाच्या नखांना कोर झाली असेल तर कारिटात बोट घुसवले जाते. यामुळे कोर तर बरी होतेच आणि जखमही भरते.

असे बहुपयोगी कारीट सहसा फोडून टाकल्याशिवाय ते मरून जात नाही. ते फळ वेलीवरून तोडले तरी जसे आहे तसेच राहते.म्हणूनच कदाचित त्याला नरकासुराची प्रतिकिती मानून ते दिवाळीला फोडले जात असावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com