Electric Bus Accident Panaji - Vasco Highway Dainik Gomantak
गोवा

Panaji Bus Accident: बस चालकाच्या प्रसंगावधनामुळे वाचले प्रवाशांचे प्राण ;नेमके काय घडले ?

Panaji Bus Accident: पणजीहून वास्‍कोला जाणारी इलेक्‍ट्रिक कदंब बस रस्‍ता सोडून डाव्‍या बाजूला संरक्षक कठड्यावर आदळली. मात्र, चालकाच्‍या प्रसंगावधानामुळे मोठा बाका प्रसंग टळला.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Bus Accident: राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच रविवारी अपघातांच्या दोन घटना घडल्या.

मात्र, या दोन्ही अपघातांमध्ये जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पणजीहून वास्‍कोला जाणारी इलेक्‍ट्रिक कदंब बस दाबोळी-चिखली येथील वळणावर आली असता, चुकीच्‍या दिशेने आलेल्‍या एका पर्यटक टॅक्‍सीमुळे अपघात घडला

यात बस रस्‍ता सोडून डाव्‍या बाजूला संरक्षक कठड्यावर आदळली. मात्र,  चालकाच्‍या प्रसंगावधानामुळे मोठा बाका प्रसंग टळला.

अधिक माहिती अशी की, पणजीहून वास्‍कोला जाणारी इलेक्‍ट्रिक कदंब बस सकाळी ११ च्‍या सुमारास चिखली येथे एका वळणावर आली. तेव्‍हा रस्‍त्‍याशेजारी पार्क केलेल्‍या पर्यटक टॅक्‍सीने अचानक चुकीच्‍या बाजूने रस्‍त्‍यावर येण्‍याचा प्रयत्‍न केला.

ताबा सुटल्याने कार अपघात

फोंडा : फर्मागुढी येथे आज सकाळी एक कार रस्‍ता सोडून दहा फूट खोल भागात कोसळली. या अपघातात चालक जखमी झाला.

तातडीने त्‍याला उपचारांसाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. कार माशेलच्या दिशेने जात होती. एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे हा अपघात झाला. हल्‍ली झालेल्‍या बहुतांश अपघातांत चालकाला डुलकी येणे, तंद्री लागणे असे प्रकार घडले आहेत. फर्मागुढी अपघातात कारमध्‍ये चालक एकटाच होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

SCROLL FOR NEXT