Goa BITS Pilani: गोव्यातील विद्यार्थ्यांला वर्षाला 60 लाख रूपये पगार; आंतरराष्ट्रीय संस्थेने दिली ऑफर...

79 हून अधिक विद्यार्थ्यांना वर्षाला 40 लाख रुपयांपेक्षा जास्त पगाराची ऑफर
(Goa BITS Pilani Students bags 60 lac rupees annual package)
(Goa BITS Pilani Students bags 60 lac rupees annual package) Dainik Gomantak

(Goa BITS Pilani Students bags 60 lac rupees annual package)

गोव्यातील BITS Pilani संस्थेच्या K. K. बिर्ला गोवा कॅम्पसच्या एका विद्यार्थ्याला प्लेसमेंटमधून वार्षिक 60 लाख 8० हजार रूपये पगार देऊ करण्यात आला आहे. हे पॅकेज गेल्या वर्षी देशांतर्गत देऊ केलेल्या सर्वोच्च पगारापेक्षा 35 टक्क्याहून जास्त आहे, असे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऋतुराज गोडसे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याला D E शॉ या बहुराष्ट्रीय गुंतवणूक व्यवस्थापन फर्मने हे पॅकेज देऊ केले आहे.

BITS पिलानीच्या KK बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये 926 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. BITS पिलानी संस्थेतील भारत आणि दुबईसाठीचे मुख्य प्लेसमेंट अधिकारी जी. बालसुब्रमन्यन यांनी ही माहिती दिली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

(Goa BITS Pilani Students bags 60 lac rupees annual package)
Goa Surf Festival 2023: समुद्राच्या लाटांवरील थरारासाठी व्हा सज्ज; गोव्यात होणार पहिला 'सर्फ फेस्टिव्हल'

बालसुब्रमन्यन यांच्या माहितीनुसार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 79 हून अधिक विद्यार्थ्यांना वर्षाला 40 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळाला आहे. संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ही आत्तापर्यंतची सर्वोच्च विद्यार्थी संख्या आहे.

वर्षाला 40 लाख रुपये पगार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. BITS पिलानी गोवा कॅम्पसमध्ये सुमारे 280 कंपन्या आल्या होत्या. Google, Microsoft, Uber, DE Shaw, Texas Instruments, Nvidia आणि Exxon Mobil यांसारख्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

या प्लेसमेंटमध्ये जागतिक टेक दिग्गजांकडून मोठ्या संख्येने ऑफर आल्या. अॅमेझॉनने 32 विद्यार्थ्यांना, उबेरने 16, मायक्रोसॉफ्टने 17, नुटानिक्सला 13 आणि गुगलने 7 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या.

(Goa BITS Pilani Students bags 60 lac rupees annual package)
Goa Bus Accident: राँग साईडने आलेल्या टॅक्सीला वाचवण्याचा नादात इलेक्ट्रिक बसचा अपघात; चिखलीतील घटना

आयटी क्षेत्रातील सरासरी पगार वर्षाला 27 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. Qualcomm ने 25 विद्यार्थ्यांना, Texas Instruments ने 21, MediaTek ने 14, Samsung Semiconductors ने 8, Exxon Mobil ने 6, Schlumberger ने 4, GE India ने 3 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत.

कन्सल्टन्सी क्षेत्रातील दिग्दज असलेल्या BCG आणि McKinsey सारख्या कंपन्या आणि JP Morgan Chase and Co सारख्या बँकेने गोवा कॅम्पसमधून अंडरग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांची नियुक्ती केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com