Goa Tourism Dainik goamantak
गोवा

Goa Tourism: मच्छिमारांचे प्रश्न सुटणार आणि पर्यटनालाही बळ मिळणार; पारंपरिक मच्छिमार पेलेंसोबत संवाद, किनाऱ्यावरील समस्यांकडे ही वेधले लक्ष

Eknath Shinde Goa Visit: पेलेंनीही कोणतीही संधी न दवडता गोव्याच्या पर्यटनासाठी महाराष्ट्राने सहकार्य करावे, अशी विनंती त्यांच्याकडे केली

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन संपताच गोवा दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाणावली येथे समुद्रकिनाऱ्यावर गोव्यातील ‘सेलेब्रिटी’ मच्छीमार पेले फर्नांडिस यांच्यासोबत संवाद साधला.

पेलेंनीही कोणतीही संधी न दवडता गोव्याच्या पर्यटनासाठी महाराष्ट्राने सहकार्य करावे, अशी विनंती त्यांच्याकडे केली. तसेच, मच्छिमारांच्या समस्यांकडेही त्यांचे लक्ष वेधले. शिंदे हे बाणावलीजवळील एका तारांकित हॉटेलमध्ये उतरले असून रविवारी संध्याकाळी त्यांनी समुद्रकिनाऱ्याला भेट दिली होती.

यावेळी पेलेंनी त्यांच्याशी संवाद साधला. पेले यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात मुंबईहून मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळेच गोव्यातील पर्यटन आणि स्थानिक मच्छीमारांना चांगला व्यवसाय मिळाला. पर्यटकांकडून स्थानिक पातळीवर ताज्या माशांना मिळणारी मागणी आणि त्यातून अनेक कुटुंबांना मिळणारा आर्थिक आधार यासाठी पेलेंनी शिंदे यांचे आभारही मानले.

महाराष्ट्राकडून सहकार्य

शिंदे यांनीही गोव्यातील पर्यटनवृद्धीसाठी महाराष्ट्राकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते निश्चितपणे मिळेल, असे सांगितले. त्यांनी बाणावली किनाऱ्यावरील ‘सनसेट’चा आस्वाद घेतला. किनाऱ्यावर फेरफटका मारताना शिंदे यांची देहबोली अतिशय प्रसन्न दिसत होती. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनीही गर्दी केली होती. शिंदे यांच्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ पेलेंनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून, त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा भीषण पुराचा तडाखा! बूढी गंडकी नदीने घरे, पूल आणि बेस कॅम्प वाहून नेले, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

संपादकीय: इन्स्टाग्रामवर हरलेले सत्ताधीश

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? एरियर मिळणार की नाही? पगारवाढीबाबतचे सर्व प्रश्न आणि उत्तरे एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT