Former Chief Minister Pratap Singh Rane and Purohit Ramapati Pitre on the occasion of Shri Vitthal Pujan in Vitthalapur-Goa, 20 July, 2021. Dainik Gomantak
गोवा

Goa: विठ्ठलापुरात विठुरायाच्या गजरात एकादशी साजरी

Goa: कोविड महामारीमुळे एकादशी (Ekadashi) उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात आले. हरवळे, होंडा, पाळी, आमोणेतून विठ्ठलाच्या (shri vithal) दर्शनासाठी भाविकांनी पदयात्रा काढली होती.

Sanjay Ghugretkar

साखळी : ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, ‘माऊली तू मुर्ती विठ्ठलाची...’, ‘विठ्ठला...पांडुरंगा...’ असे विठ्ठल भक्तांचे हे सूर यंदाही गोव्याचे प्रती पंढरपूर (pandharpur) म्हणून समजल्या जाणाऱ्या विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांचे जुळले आणि विठ्ठलाच्या दर्शनाने सगळी भक्त मंडळी तृप्त झाली.
आज आषाढी एकादशी गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही विठ्ठलापुरात कुठेच मिरवणूक नाही, घोषणा नाही. तरीही भक्त आले. मन, शांत चित्ताने विठ्ठल दर्शन घेऊन तृप्त झाले. विठ्ठल मंदिर देवस्थान समितीने कोरोनामुळे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कुठलाच विशेष कार्यक्रम ठेवला नाही. आवाहन केले होते, की मंदिरात भक्तांनी येण्याचे टाळावे. गर्दी करू नये. सरकारी नियम पाळावे. घरी थांबूनच विठ्ठल दर्शन घ्यावे. त्या नियमाचे काटेकोरपणे पालन भक्तांनी केले. मंदिरात गर्दी केली नाही. विशेष मिरवणूकही नव्हती. तरीही पर्ये, हरवळे, होंडा, विर्डी, न्हावेली, कोठंबी-पाळी आदी भागातून काही वारकरी विठ्ठल भक्त पायी चालत विठ्ठलापुरात दाखल होत होते व विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त होत होते.

सकाळी देवस्थान समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री व पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे (pratapsingh Rane) यांनी विठ्ठलाला अभिषेक केला, पूजा केली. (Shri Vitthal Pujan) नंतर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी, महाजनांनी, गावकऱ्यांनी अभिषेक केला, नंतर असंख्य भाविकांनी दिवसभर मंदिरात जाऊन विठ्ठल चरणी अभिषेक केला. भक्तांची गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मिरवणूक, घोषणा करता येत नसल्यामुळे चेहऱ्यावर पसरलेली निराशा लपवता येत नव्हती, तरीही भक्तांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन समाधानी तृप्त झाल्याचे सांगितले. मुसळधार पावसाची तमा न बाळगता भाविकांनी विठ्ठलापुरात येऊन विठू माऊलीचे दर्शन घेतले. मनोमन ही इच्छा व्यक्त केली ‘माऊली माझे आई, पुढील वर्षी तरी तुझ्या दर्शनाची वारी मनासारखी मिरवणुकीने, तुझ्या जयजयकाराने होऊ दे.."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT