Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : दोन अपघातांमध्ये आठजण जखमी

न्हावेलीत दोन बसची टक्कर : वास्कोत टिप्परने वाहनांना ठोकरले

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात न्हावेली-साखळी आणि दाबोळी येथे दाेन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत एकूण आठजण जखमी झाले. न्हावेली-साखळी येथे शनिवारी संध्याकाळी कदंब बस व गोमेकॉच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात कदंब बस व गोमेकॉ कर्मचाऱ्यांच्या बसमधील पाचजण जखमी झाले. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कदंब बसची दिशाच बदलून ती रस्त्याबाहेर गेली.

अपघाताचे वृत्त समजताच न्हावेलीचे सरपंच कालिदास गावस व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली व बसमधील जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी साखळी येथील सामाजिक आरोग्य केंद्रात नेले.

दुसऱ्या घटनेत आज दुपारी आल्तो-दाबोळी येथे ट्रॅफिक सिग्नलजवळ वास्कोच्या दिशेने भरवेगाने जाणाऱ्या एका टिप्पर ट्रकने ओम्नी, ब्रिझा, ॲक्टीव्हा आणि पाण्याच्या टँकरला जोरात धडक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT