Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीत एका रात्रीत आठ कार्यालये फोडली

लॅपटॉपसह सव्वा लाखांचा ऐवज लंपास

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News डिचोली शहरात एकाच रात्री एकाच इमारतीतील आठ खासगी आस्थापनांची कार्यालये फोडण्याचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी एक लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम मिळून अंदाजे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.चोरट्यांच्या हाती मोठे घबाड लागले नसले, तरी या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मागील ‘वासुदेव आर्केड’ या इमारतीतील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील बिल्डर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांची मिळून आठ खासगी आस्थापनांची कार्यालये फोडण्यात आली आहेत.

मंगळवार मध्यरात्र ते आज पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचा अंदाज आहे. डिचोली पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्‍वान इमारतीच्या मागच्या बाजूने जाऊन घुटमळले.

एकाच रात्री आठ कार्यालये फोडण्यात आल्याने इमारतीतील सुरक्षेच्या बाबतीत असलेल्या त्रुटी उघड झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीत सुरक्षा रक्षक नाही. त्यातच इमारतीची गेट सदैव उघडीच असते. मुख्य गेटमधूनच चोरट्यांनी इमारतीत प्रवेश केल्याचा संशय आहे.

घटनेची पुनरावृत्ती

तीन महिन्यांपूर्वी शहरातील ‘टाऊन सेंटर’ इमारतीत असाच प्रकार घडला होता. एकाच रात्री एक सरकारी मिळून चार कार्यालये फोडण्यात आली होती.

त्यावेळीही चोरट्यांच्या हाती मोठे घबाड लागले नव्हते. या घटनेनंतर पुन्हा कार्यालये फोडण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

Panaji Traffic Congestion: कॅसिनो अन् बेशिस्त पार्किंगमुळे पणजीची कोंडी! गोवा खंडपीठाचे वाहतूक पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

October Heatwave: 41.4 अंश तापमानाने म्हापसा तापला? शहरातील उष्णतेच्या नोंदींकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

October Temperature: पारा चढला, गोवा तापला! 37.2 अंश तापमानाची नोंद; उष्णतेमुळे यलो अलर्ट जारी

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

SCROLL FOR NEXT