गोवा

आमदारांनी शपथ घेऊनही शेवटी गोव्यात काँग्रेस फुटलीच, 'या' चुकांची होतेय चर्चा

डॅमेज कंट्रोलसाठी पक्षाने किंवा केंद्रीय नेतृत्वाने पुरेसे प्रयत्न केले नाहीत हे उघड सत्य आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रानंतर गोव्यात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' (Operation Lotus) यशस्वी झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी पक्षांतराचा प्रयोग फसल्यानंतर आज अखेर, काँग्रेसच्या आठ आमदारांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विरोधीपक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo), माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांचा यात समावेश आहे. काँग्रेस आमदारांनी ऐकेकाळी पक्षांतर करणार नाही यासाठी मंदीर, चर्च मध्ये जाऊन शपथ घेतली. गोव्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस फुटीची चर्चा राज्यात होतीच तिला बुधवारी मुर्त स्वरूप आले.

गोवा विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यात काँग्रेस आमदारांनी बंड केले. भाजपमध्ये सामिल होण्याचा पवित्रा घेतलेल्या आमदारांचे बंड त्यावेळी फसले. त्यानंतर काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक राज्यात दाखल झाले. त्यावेळी बंडखोर आमदारांची तात्पुरती समजूत काढण्यात वासनिक यांना यश आले होते. पण, पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी प्रकर्षाने दिसत होती. त्यासाठी पक्षाने किंवा केंद्रीय नेतृत्वाने पुरेसे प्रयत्न केले नाहीत हे उघड सत्य आहे. याशिवाय इतर चुकां ज्या पक्षाला भोव्याला याची देखील सर्वत्र चर्चा होत आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी दिसून आली. यावेळी पक्षाच्या चार आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. यावरही पक्षाकडून ठोस उपाययोजना झाली नाही. तसेच, नव्या अध्यक्षांवरून वाद निर्माण झाला पण पक्षाने कारवाई केली नाही. मायकल लोबो यांनी निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. लोबो यांना विरोध होत असताना दिगंबर कामत यांना डावलून पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेते केले.

गोवा विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. यावेळी पक्षाने गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेतला, पण प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao) यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते गुंडूराव यांच्यावर नाराज होते. दिनेश गुंडूराव यांनी मात्र भाजपवर आरोप करत, गोव्यात लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पैसा आणि सत्तेचा वापर करून विरोधक संपविण्याचे काम भाजप करत आहे. असा आरोप गुंडूराव यांनी केला आहे.

भाजप प्रवेश केलेल्या आमदारांची यादी

मायकेल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि डेलिला लोबो.

काँग्रेसमध्ये उरलेल्या आमदारांची यादी

युरी आलेमाव, अल्टोन डिकॉस्टा आणि कार्लुस फरेरा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मुंगूल-मडगावातील गँगवॉरचा गोव्यातील अंडरवल्डशी संबंध; वॉल्टर गँगने 2 वर्षापूर्वीच्या मारहाणीचा घेतला बदला

धमाका! खास मोबाईलप्रेमींसाठी पोकोने लॉन्च केला धमाकेदार स्मार्टफोन, Vivo आणि Realme चं वाढलं टेन्शन; जाणून घ्या अफलातून फीचर्स

Nitin Raiker: अभिमानास्पद! अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांना भारत सरकारचा 'ब्रॉन्झ डिस्क मेडल' पुरस्कार जाहीर

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा! गोव्यात मंत्री, राजकीय नेत्यांनी घरी फडकवला भारतीय ध्वज

Goa Beef Shortage: गोव्यात सलग दहाव्या दिवशीही 'बीफ'ची टंचाई कायम, व्यापारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन

SCROLL FOR NEXT