COVID-19 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोविडने 8 मुलांचे पालक हिरावले

या सर्व मुलांना त्यांच्या नातलगांनीच आधार दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाकाळात गोव्यातील अनेक लोकांनी आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्य गमावले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक होते. मात्र, मृत्यू दर कमी होता. पण दुसऱ्या लाटेत हे चित्र बदलले. यात राज्यातील अनेकांचे बळी गेले. कोविडच्या (COVID-19) तिसऱ्या लाटेत राज्यातील 3 मुलांनी आपले पालक गमावले आहेत. दुसऱ्या लाटेत 5 मुले अनाथ झाली होती. या 8 मुलांमध्ये एका 16 वर्षीय मुलाचा समावेश आहे. इतर 7 मुलांचे वय 16 पेक्षा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. (Coronavirus Goa)

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांचे संगोपन, शिक्षण (Education) यांबाबत सरकारी पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व मुलांना त्यांच्या नातलगांनीच आधार दिला असून त्यांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे. या मुलांना दोन लाखांचे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची प्रक्रिया महिला आणि बाल कल्याण खात्यामार्फत सुरू आहे.

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांच्या मदतीसाठी राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्था (NGO) पुढे आल्या आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय महिला आणि बाल कल्याण खाते प्रत्येक महिन्याला प्रत्येक राज्यातील अनाथ मुलांचा आढावा घेत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रालयाने गोव्यातील महिला आणि बाल कल्याण खात्याकडून गोव्यातील आठ मुलांची माहिती घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati District Six Assembly Seats: कुशावती मतदारसंघांच्या मुद्द्यावरून गोव्यात राजकीय वाद! 8 पैकी 6 जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर गोवा फॉरवर्ड अन् भाजपचा जोरदार हल्ला

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

SCROLL FOR NEXT