गोव्यात कॉंग्रेसची सत्ता आल्यास महिलांच्या रक्षणासाठी प्रथम प्राधान्य: प्रियंका गांधी

नावेली येथील जाहीर सभेत प्रियांका गांधी बोलत होत्या.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यास गोव्यातील पर्यावरण, संस्कृती जपण्यासाठी पावले उचलली जणार आहेत. शिवाय महिलांच्या रक्षणासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. कारण भाजपचा मंत्रीच अत्याचार प्रकरणात आहे आणि त्यालाच भाजपने उमेदवारी देऊन महिलांचा अपमान केलेला आहे. या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाचा दर्जा काय तो लक्षात येतो, असा आरोप कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. (Congress Goa News)

Priyanka Gandhi
चर्चिल आलेमाव यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवा; 'आप'ची मागणी

नावेली येथील जाहीर सभेत प्रियांका गांधी बोलत होत्या. त्यांनी या सभेत गोमंतकीयांसाठी ज्या योजना प्रस्तावीत केल्या आहेत त्यांची यादीच जाहीर केली. त्या म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात गोव्यात लोकांचे रहाणीमान अगदी त्रासदायक बनले होते. याला भाजप सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारने जे निर्णय घेतले ते लोकविरोधी होते. नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वांनाच भयंकर त्रास सोसावा लागत आहे. गोव्यातील सरकार लोकांना कसलीही मदत पुरवत नाही तर त्यांच्या त्रासात भर टाकण्याचे निर्णय घेते, असा आरोपही त्यांनी केला.

कॉंग्रेसला (Congress) निवडून दिल्यास पेट्रोल व डिझलच्या किंमती कमी केल्या जातील. मास, मासळी, भाजी, फळांचे दर जे गगनाला भिडले आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रय्तन केले जातील. कॉंग्रेस पक्ष लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असून, रोजगारासाठी 500 करोड रुपयांची तरतूद केली जाईल. गोमंतकीयांचे रहाणीमान सुधारावे म्हणून प्रत्येक कुटुंबाला 6 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. गोव्याचा (Goa) निसर्ग, वारसाचे रक्षण केले जातील. कर्नाटकाचे माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांचेही भाषण झाले.

Priyanka Gandhi
गोव्यात 80 वर्षांवरील 20 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

स्थिर सरकार कॉंग्रेसच देईल

गोमंतकीयांसाठी परंपरा, संस्कृती, विकास, लोकांचे रहाणीमान सुधारणे, महागाई नियंत्रणात, रोजगार निर्मिती यावर भर दिला जाईल. जे बाहेरील पक्ष गोव्यात आले आहेत त्यांना गोव्याचे व गोमंतकीयांचे काहीच पडलेले नाही. गोव्याला व गोमंतकीयांना नेमके काय पाहिजे कॉंग्रेसलाच माहीत आहे. स्थिर सरकार देण्याची क्षमता केवळ कॉंग्रेस पक्षाकडेच आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

गोव्यात औद्योगिक, शैक्षणिक हब तयार केले जाणार आहे. मी कॉंग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही असे वचन नावेलीचे कॉंग्रेस उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांनी सभेत दिले. आम्हाला बाहेरील आमदार नको असून, आपण नावेलीचा सुपूत्र आहे. आमदार (MLA) व मंत्री असताना आपण अनेक योजना नावेलीसाठी राबविल्या, असेही फुर्तादो म्हणाले. गांधी परिवार तसेच निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांनी खऱ्या अर्थाने गोव्याच्या उभारणीस मोठे योगदान दिले असल्याचेही फुर्तादो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com