Goa Agriculture: पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषीतज्ज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी लागणारे मार्गदर्शन जुने गोवे कृषी महाविद्यालयाच्या वतीने मोफत देण्यात येतेय. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंकळीकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. विनोद आतकरी म्हणाले, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याच्या महत्त्वाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अन्नसुरक्षेमध्ये पौष्टिक तृणधान्याचे योगदान वाढविणे, प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक, त्याचा वापर वाढविण्यास प्रयत्न करणे, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन, गुणवत्ता वाढवून वापरास प्राधान्य देणार आहे
पौष्टिक तृणधान्याचे फायदे
आपल्या शरीरातील विषारी पदार्थ कमी करणे
हानिकारक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणे
ब्रेस्ट कॅन्सर प्रतिबंध करणे
डायबिटीस प्रतिबंध करणे
उच्च रक्तदाब नियमित करणे
हृदयरोगपासून संरक्षण करणे
श्वसनाशी निगडित विकार व दम्याचा त्रास कमी करणे
किडनी, यकृत व रोगप्रतिकार क्षमता कार्य सुधारणे
आतड्याचा कॅन्सर इत्यादी विकार नियंत्रणात ठेवणे
बद्धकोष्ठता, पोटातील वायू, स्नायूमध्ये पेटके येणे कमी करणे/यावर उपाय करणे
शिवाय ही पिके कमी पाण्यावर, हलक्या जमिनीत चांगली येतात. कीड व रोगप्रतिकारक असतात, कमी उत्पादन खर्च असतो
वातावरणावरील ताण कमी करतात
कमी कालावधीत तयार होतात. यामुळे अन्नसुरक्षा, आहारसुरक्षा, रोगांपासून सुरक्षा, आर्थिक सुरक्षासाठी महत्त्वाचे आहे.
तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत पौष्टिक तृणधान्यामध्ये कॅल्शिअम, लोह, आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे वापर आवश्यक आहे.
केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्राकडे सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यास 72 देशांनी पाठिंबा दिला. त्यानुसार संयुक्त राष्ट्र महासभेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले. राज्यात तृणधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. सुरेश कुंकळीकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.