पणजी: शिक्षण संचालकांनी गोव्यातील शैक्षणिक संस्थांना गुगल फॉर्म पाठवून ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमात किती विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले त्यांची संख्या कळवावी, असे परिपत्रक पाठवले आहे. त्याचा हेतू काय आहे? ह्या माहितीच्या आधारे संबंधित मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना निलंबित करण्याचा तर शिक्षण खात्याचा विचार नाही ना? अशी विचारणा तुये येथील जागृत नागरिक देवेंद्र कांदोळकर यांनी शिक्षण संचालकांना पत्र पाठवून केली आहे.
गोव्यातील सर्व शैक्षणिक संस्थात शुक्रवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विशेष प्रार्थना सभेचे आयोजन केले जावे. त्यात सुरुवातीला भारतमातेचे पूजन व त्यानंतर संपूर्ण वंदे मातरम् गायन करावे, असे शिक्षण खात्याने कळवले आहे.
वास्कोत एका प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवले होते. ‘मशिदीत प्रार्थना कशी करतात हे दाखविण्यासाठीच संघटनेच्या निमंत्रणावरून तेथे पाठवले. पण कारणे दाखवा नोटीस न करता आपल्याला निलंबित केले, असे प्राचार्यांचे म्हणणे होते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मशिदीत पाठवण्यास परवानगी देणाऱ्या प्राचार्यांना शिक्षण खाते निलंबित करते. वंदे मातरम् गायन कार्यक्रमात तर सर्व शिक्षणसंस्था भारतमातेचे पूजन करणार. मग संबंधितांना निलंबित करणार का?,अशी विचारणा त्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी ‘वास्को येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून त्यांना प्रार्थना करण्यास भाग पाडले. तो ‘स्कूल जिहाद’ चा प्रकार असल्याचा आरोप करून त्या प्राचार्याला निलंबित करा, अशी मागणी काही लोकांनी केली तेव्हा शिक्षण खात्याने त्यांना निलंबित केले होते, याची आठवण पत्रातून करून देण्यात आली आहे.
गोव्यातील विद्यालयात हिंदूबरोबरच ख्रिस्ती, बौद्ध, मुस्लीम, शीख विद्यार्थीही शिक्षण घेत असतात. उद्या कोणा पालकांनी शिक्षणखात्याकडे अमुक प्राचार्यांनी विद्यालयात हिंदू देवतेची पूजा करवून घेतली, अशी तक्रार केली. तर गुगल फॉर्मवर दिलेल्या माहितीच्या आधारे शिक्षण खाते मुख्याध्यापक – प्राचार्यांना निलंबित करणार नाही ना? अशी विचारणा त्यांनी शिक्षण खात्याकडे केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.