ED Raid Karnataka Congress MLA Dainik Gomantak
गोवा

ED Raid Karnataka Congress MLA: 'काँग्रेस आणि भ्रष्टाचार न संपणारी कहाणी...'; कारवारच्या आमदाराच्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी; गोवा भाजपनं साधला निशाणा

Karnataka Congress MLA: कर्नाटकचे काँग्रेस आमदार सतीश कृष्ण सैल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

ED Raid Karnataka Congress MLA: कर्नाटकचे काँग्रेस आमदार सतीश कृष्ण सैल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने मोठी कारवाई केली. सैल यांच्या विविध ठिकाणांवर ईडीने छापेमारी करुन कोट्यवधींची रोकड, 6.8 किलोग्राम सोने आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. सतीश कृष्ण सैल हे कारवार-अंकोलाचे आमदार आहेत.

चार राज्यांमध्ये छापेमारी

ईडी अधिकाऱ्यांनी 13 आणि 14 ऑगस्ट रोजी सतीश कृष्ण सैल यांच्या अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. ही छापेमारी केवळ कर्नाटकातच नाही, तर गोवा (Goa), मुंबई आणि नवी दिल्लीतील सैल यांच्या मालमत्तांवरही करण्यात आली. छापेमारीत तब्बल 1.7 कोटींची रोकड आणि 6.8 किलोग्राम सोने जप्त करण्यात आले. याशिवाय, बँक खात्यांमधील 14 कोटींहून अधिकची रोकडही तात्काळ ईडीने फ्रीज केली.

ईडीने सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली की, या छापेमारीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक नोंदी असलेले रेकॉर्ड्स मिळाले. सैल यांच्या घरात असलेले काही लॉकर सील करण्यात आले, जेणेकरुन पुढील तपासणी करता येईल. छापेमारीच्या वेळी आमदार आणि त्यांचे कुटुंबीय घरी उपस्थित नव्हते, त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदारांशी संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.

काँग्रेस आणि भ्रष्टाचार: एक कधीही न संपणारी कहाणी!

दुसरीकडे, भाजपने (BJP) ईडीच्या या कारवाईवरुन काँग्रेसवर शरसंधान साधले. कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराची 21 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. बनावट कंपनी एसएमएसपीएलद्वारे बेकायदेशीर लोहखनिजाचा पैसा गोव्यात जमीन हडप करण्यासाठी वापरण्यात आला. तरीही गोवा काँग्रेस निर्लज्जपणे गप्प आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार ही न संपणारी कहाणी आहे, असे म्हणत टीकास्त्र डागले.

'150 कोटींचा कर भरतो, मग...' काँग्रेसचा आरोप

त्याचवेळी, ईडीच्या या कारवाईनंतर कर्नाटक काँग्रेसने याला राजकीय सूड म्हटले. काँग्रेसचे नेते मंकल वैद्य यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप केले. "आमदार सतीश सैल हे दरवर्षी 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात. त्यांची सर्व मालमत्ता कायदेशीर मार्गाने कमावलेली आहे आणि ते हे सर्व पुरावे ईडीला देतील." काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, केंद्रातील भाजप सरकार जाणूनबुजून काँग्रेस नेत्यांना त्रास देण्यासाठी ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे.

यापूर्वी, ईडीने कर्नाटकमध्ये भाजपचे नेते जनार्दन रेड्डी यांचे माजी सहकारी आणि खाण व्यावसायिक यांच्यावरही छापेमारी केली होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांवरील ईडीच्या या कारवाईमुळे कर्नाटकात आणि देशाच्या राजकारणात खळबळ माजलीआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire News: गोव्यात आगीचे तांडव! एकाच दिवशी आगीच्या 4 दुर्घटना; रेस्टॉरंट-गोदाम भस्मभात, 50 लाखांहून अधिक नुकसान

Goa Crime: 2 लग्नं लपवली, गोव्यात तिसऱ्यांदा बोहल्यावर; संसार सोडून मुंबईत पुन्हा केले लग्न, आधुनिक 'लखोबा'वर गुन्हा दाखल

Arpora: बर्च अग्निकांड’ प्रकरणी नवी अपडेट! हडफडेच्या सरपंच, सचिवांची हायकोर्टात धाव; अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु

Paira Mayem: पैरात तणावपूर्व वातावरण! स्थानिक संघटित, दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; ग्रामस्थ मागण्यांवर ठाम

Goa Assembly Session: 'हडफडे अग्नितांडव, पर्यावरण विषयांवर सरकारला घेरणार'! विरोधी आमदारांची रणनीती; महसुलाचा कणाच मोडल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT