ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

ED raid Goa: अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
ED Raid
ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दुबईतील मालमत्तेत झालेली गुंतवणूक ही गोव्यातून हवालामार्गे पाठवलेल्या पैशांतून झाल्याच्या संशयावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दोनापावला आणि बांबोळी येथे छापेमारी केली.

दुबईत हवालामार्गे संपत्ती खरेदी करणाऱ्या भारतीय नागरिकांविरोधात ईडीने शुक्रवारी पहाटेपासून मोठी मोहीम राबवली. दिल्ली-एनसीआर आणि गोवा येथे एकाचवेळी सुरू झालेली ही झडती सकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झाली.

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे पुरावे बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे किंवा हवाला नेटवर्कशी संबंधित सूत्रधारांची ओळख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.

ईडीला अलीकडेच अशा भारतीयांची यादी प्राप्त झाली होती, ज्यांनी अनधिकृतपणे दुबईतील स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचा संशय आहे. त्यानंतर परकीय चलन व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत (FEMA) प्रकरण नोंदवून ही छापा मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत दिल्ली-एनसीआर, गोवा आणि दुबईदरम्यान कार्यरत असलेल्या हवाला ऑपरेटरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे विश्लेषण करून निधीचा मागोवा घेण्याची आणि परदेशात पाठविलेल्या रकमेचा संपूर्ण प्रवास उघड करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ईडीने हवाला मार्गाने दुबईत स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची स्वतंत्र यादी तयार केली असून, त्यांना लवकरच दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी समन्स पाठवले जाणार आहेत. या कारवाईनंतर तपासाचा व्याप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परदेशातील गुप्त मालमत्ता, निधी हस्तांतरण आणि बेकायदेशीर व्यवहारांचे जाळे उघड करण्यासाठी ईडीचे विशेष पथक कार्यरतकरण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ED Raid
Goa Crime: वेफर्स-कॉफीच्या पाकिटातून कोकेन विक्री, आंतरराष्ट्रीय रॅकेटवर ED ची नजर; 43 कोटींच्या तस्करीप्रकरणी 7 जणांवर गुन्हा

येथे झाली छापेमारी

गोवा : दोनापावला आणि बांबोळी

दिल्ली-एनसीआर : अनेक व्यावसायिक कार्यालये

दुबई : हवाला नेटवर्कशी संबंधित व्यवहारांचा तपास

ED Raid
ED Raid: गोवा भूखंड घोटाळा! अंमलबजावणी संचालनालयाची मोठी कारवाई; 1.25 कोटी रुपयांचे क्रिप्टो चलन जप्त

प्राथमिक निष्कर्ष

बेकायदेशीर निधी परदेशात हस्तांतरित केल्याचे संकेत

दुबईत स्थावर मालमत्ता खरेदीसाठी वापरलेला निधी संशयास्पद

अनेक व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात

लवकरच समन्स जारी होण्याची शक्यता

विशेष पथक घेत आहे निधी प्रवाहाचा मागोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com