ED Raid: ‘ईडी’ची मोठी कारवाई! 61 लाखांची मालमत्ता जप्त; पोंझी स्कीमधून 9.33 कोटीच्या फसवणुकीचा दावा

ED Raid Panaji: ईडी पणजी विभागीय कार्यालयाने पोंझी स्कीम घोटाळा प्रकरणात कारवाई करत तब्बल ६१.५३ लाख किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
ED Raid
ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने पोंझी स्कीम घोटाळा प्रकरणात कारवाई करत तब्बल ६१.५३ लाख किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दोन निवासी फ्लॅट्स, मुदत ठेव (एफ.डी.), तसेच इक्विटी शेअर्सचा समावेश असून, ही मालमत्ता गोहिल जयकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावे आहे. ही कारवाई पैशांच्या गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत करण्यात आली असून, संबंधित गुन्हा रंग्गीता एंटरप्रायझेस या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेशी संबंधित आहे.

‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे कक्षाने दाखल केलेल्या एफआयआरवरून सुरू झाली आहे. गोहिल जयकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवास्तव नफा देण्याचे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप आहे. या योजनेतून तब्बल ९.३३ कोटींचा घोटाळा झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

‘ईडी’च्या चौकशीत संशयितांनी या गुन्ह्यातील रक्कम वैयक्तिक ऐषोराम, मालमत्ता खरेदी, गुंतवणूक आणि अन्य खर्चासाठी वापरल्याचे समोर आले आहे. जप्त केलेल्या मालमत्तेद्वारे संशयितांना गुन्ह्यातील लाभ उपभोगण्यापासून रोखण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असल्याचे ‘ईडी’ने स्पष्ट केले आहे.

ED Raid
ED Raid: ‘ईडी’ची मोठी कारवाई! ‘बिग डॅडी’सह म्हापशातील छाप्यांत 4 कोटी जप्त, देशभरात 15 ठिकाणी धाड

‘ईडी’च्या तपासानुसार, गोहिल जयकुमार यांनी गोवा व गुजरातमध्ये कार्यालये ठेवून रंग्गीता एंटरप्रायझेस या नावाखाली स्कीम चालवली. गुंतवणूकदारांना दरमहा २० टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असे अवास्तव आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जमा झालेली रक्कम कोणत्याही वैध व्यवसायात गुंतवली न जाता थेट जयकुमार व त्यांच्या एजंटांच्या वैयक्तिक खात्यांत जमा केली गेली.

ED Raid
Asia Cup दरम्यान युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अडचणीत; 'ED'ने बजावले समन्स, नेमकं प्रकरण काय?

ही स्कीम पोंझी प्रकारची असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. नवीन गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे आधीच्या गुंतवणूकदारांना परताव्यासाठी वापरले जात होते. मात्र, एप्रिल-मे २०२२ मध्ये पैसे काढण्याच्या मागण्या वाढल्या आणि जमा होणारी रक्कम कमी झाल्याने ही स्कीम कोलमडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com