ED Raid Goa Dainik Gomantak
गोवा

ED Raid Goa: चड्डी-बनियनवर आसगावात फिरणारा अचानक झाला 'गोल्ड मॅन', 1,200 कोटीच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ची कारवाई; लक्झरी गाड्या जप्त

ED raid Goa land scam: बार्देशातील काही मातब्बर लोकांची घरे आणि आस्थापनांवर मंगळवारी ‘ईडी’ने घातलेल्या छाप्यांमध्ये आसगाव येथील यशवंत सावंत याच्या घराचाही समावेश होता.

Sameer Amunekar

पणजी/म्हापसा: बार्देशातील काही मातब्बर लोकांची घरे आणि आस्थापनांवर मंगळवारी ‘ईडी’ने घातलेल्या छाप्यांमध्ये आसगाव येथील यशवंत सावंत याच्या घराचाही समावेश होता. एकेकाळी चड्डी-बनियान घालून फिरणाऱ्या सावंत याचा अचानक बदललेला लूक पाहून स्थानिक अचंबित व्हायचे.

यशवंत हा सर्वसामान्य माणूस असून एकेकाळी या भागात त्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. परंतु, काही काळानंतर त्याने या व्यवसायाला तिलांजली देत घरी आराम केला, असे स्थानिक लोकांनी सांगितले.

यादरम्यान सावंत गळाभर सोनसाखळ्या घालून वावरताना दिसायचा. मंगळवारी ‘ईडी’च्या छाप्यात सावंत याच्या घरीही अचानक छापा पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून येत्या काही दिवसांत यामागील सत्य बाहेर येण्याची प्रतीक्षा स्थानिक ग्रामस्थांना आहे.

राज्यातील भू-बळकाव प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी), पणजी विभाग कार्यालयाकडून ९ आणि १० रोजी मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली. गोवा आणि हैदराबादमधील एकूण १३ ठिकाणी हे छापे घातले असून, यात यशवंत सावंत नामक व्यक्तीसह इतरांवर कारवाई केली आहे. संबंधित जमिनींची बाजारभावानुसार एकूण किंमत १,२०० कोटी रुपयांहून अधिक अाहे.

तिसऱ्या पक्षाला जमीन विक्री

या जमिनीपैकी काही भाग नंतर तिसऱ्या पक्षाला विकल्याने कोट्यवधी रुपयांचा गुन्ह्यातून मिळकतीचा पैसा निर्माण झाल्याचे ‘ईडी’ला आढळून आले आहे. या छापेमारीदरम्यान ईडीने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता व रोख रक्कम जप्त केली आहे. त्यात सुमारे ७२ लाख रुपये, लक्झरी गाड्यामध्ये पॉर्शे केमॅन, बीएमडब्ल्यू ६५०, रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू एम ५ आणि ऑडी ए ६ अशा सात महागड्या गाड्या जप्त केल्या.

संशयितांची बँक खाती गोठवली

आरोपींशी संबंधित अनेक बँक खाती व मुदत ठेव ‘ईडी’कडून गोठवली आहेत. तसेच संशयितांकडून मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, नोंदी आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. ‘ईडी’च्या माहितीनुसार, या तपासाद्वारे गोव्यातील अशा अनेक बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारांचे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT