Money Laundering Probe Dainik Gomantak
गोवा

अंमली पदार्थांची तस्करी अन् कोट्यवधींचे बंगले..! गोव्यात ड्रग्ज माफियांच्या आर्थिक साम्राज्याला 'ईडी'चा सुरुंग! 7.17 कोटींची मालमत्ता जप्त

Money Laundering Probe: राज्यातील अंमली पदार्थ तस्करी आणि त्यातून होणाऱ्या मनी लाँड्रिंग विरोधात ईडीने मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

पणजी: राज्यातील अंमली पदार्थ तस्करी आणि त्यातून होणाऱ्या मनी लाँड्रिंग विरोधात ईडीने मोठी कारवाई केली. पणजी क्षेत्रीय कार्यालयाने अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्यातून कमावलेली सुमारे 7 कोटी 17 लाखांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली.

एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करताना ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून (Proceeds of Crime) उभी केल्याचे समोर आले. या कारवाईमुळे गोव्यातील ड्रग्ज माफियांच्या आर्थिक साम्राज्याला मोठा झटका बसला असून तपास यंत्रणांनी आता या व्यवसायातील आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणाची पाळेमुळे मार्च 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नोंदवलेल्या तक्रारीत आहेत. उगोचुकवू सोलोमन उबाबुको, इन्फिनिटी जॉन ऊर्फ डेव्हिड आणि प्रसाद प्रकाश वाळके यांच्या विरोधात अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्याचा आधार घेत 'ईडी'ने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) तपास सुरु केला.

एनसीबीने हणजूण-असागाव येथील एका जागेवर धाड टाकली असता तिथे मोठ्या प्रमाणात एलएसडी, कोकेन, चरस आणि गांजा यांसारखे अंमली पदार्थ जप्त केले. त्यानंतर प्रसाद वाळके याच्या घरावर टाकलेल्या धाडीतही एलएसडी सापडले. वाळके हा या व्यवसायातील जुना गुन्हेगार असून त्याला यापूर्वी 2018 मध्ये एनसीबीने आणि 2023 मध्ये गोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने एमडीएमए, एक्स्टसी पावडर आणि गांजा तस्करी प्रकरणी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दुसरीकडे, ईडीच्या (ED) तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेला पैसा बँकिंग प्रणालीत फिरवण्यासाठी मोठी शक्कल लढवण्यात आली होती. प्रसाद वाळके आणि त्याची पत्नी शीतल वाळके यांच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करण्यात आली होती. मात्र हा सर्व पैसा ड्रग्ज तस्करीतून आल्याचे आता तपासात निष्पन्न झाले.

याच पैशातून त्यांनी बार्देश तालुक्यातील असागाव येथे आलिशान मालमत्ता खरेदी केल्या होत्या. यामध्ये सर्वे क्रमांक 155/10 मधील एक तीन मजली इमारत आणि सर्वे क्रमांक 182/56 व 182/47 मधील दोन दुमजली घरांचा समावेश आहे. ही सर्व घरे आता ईडीने सील केली.

अंमली पदार्थांच्या व्यवसायावर केवळ कारवाई करुन भागणार नाही, तर यातून निर्माण होणारी बेकायदेशीर संपत्ती नष्ट करणे आवश्यक आहे, या उद्देशाने ईडीने ही पावले उचलली. बेकायदेशीर कृत्यातून मिळवलेला पैसा मुख्य प्रवाहात आणणाऱ्या मनी लाँड्रिंगच्या साखळीवर ईडीने लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप संपलेला नाही. या व्यवसायात आणखी कोणाचे संबंध आहेत आणि इतर कोणत्या गुप्त मालमत्ता या पैशातून खरेदी केल्या गेल्या आहेत का, याचा शोध अधिकारी घेत आहेत. गोव्यातील (Goa) ड्रग्ज रॅकेटवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक प्रहार मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT