Land Grabbing Case Goa Dainik Gomantak
गोवा

जमीन हडप प्रकरणी गोव्यात ED ची मोठी कारवाई; 39.24 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त

बेकायदेशीरपणे जमीन संपादित करणाऱ्या लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत 31 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Pramod Yadav

Land Grabbing Case Goa: जमीन हडप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यात मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून राज्यात बेकायदेशीरपणे जमीन संपादित करणाऱ्या लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत 31 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

सर्कल रेटनुसार एकूण 39.24 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने 25 नोव्हेंबरच्या एका निवेदनात म्हटले आहे.

स्थावर मालमत्ता बेकायदेशीरपणे बळकावल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी यासह काही जणांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमधून मनी लाँड्रिंग प्रकरण प्रकरण उघडकीस आले होते.

संशयित आरोपी त्यांच्या नावावर किंवा सहकारी किंवा नातेवाईकांच्या नावे विविध स्थावर मालमत्ता बेकायदेशीरपणे केल्या होत्या, असे ईडीने म्हटले आहे.

स्थावर मालमत्ता त्यांच्या पूर्वजांच्या मालकीच्या असल्याचे दाखवण्यासाठी आरोपींनी जमिनीच्या नोंदींमध्ये बनावट कागदपत्रांचा उपयोग केला, असे ईडीने म्हटले आहे.

बनावट दस्तऐवजांच्या आधारे वारसा नोंदी तयार करून त्यांची नावे अद्ययावत किंवा जमिनीच्या नोंदींमध्ये समाविष्ट करून घेतली. यापैकी काही बेकायदेशीरपणे मिळवलेल्या मालमत्ता आरोपींनी गोवा आणि इतर राज्यांतील खरेदीदारांना विकल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT