गणेश चतुर्थीचे (Ganesh Chaturthi 2021) वेध सर्वांना लागले आहेत. गावागावातील चित्रशाळेत गणेश मूर्ती (Lord Ganesh Idols) साकारण्याचे काम वेगाने सुरू आहे, तर काही ठिकाणी शाडू मातीच्या इकोफ्रेंडली गणेश मूर्ती (Eco-friendly Ganesh idols ahead of Ganesh Festival) विक्रीसही आल्या आहेत.
कोकणातील सासोली गावातील एका कलाकाराच्या अशा प्रकारच्या इकोफ्रेंडली मूर्ती करासवाडा-म्हापसा येथे थिवीकडे जाणाऱ्या मार्गावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दीड हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत किमतीच्या मूर्ती तिथे विक्रीस उपलब्ध आहेत. पणजी येथेही इकोफ्रेंडली मूर्ती झरीकडील एका स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.
मधलेभाट-शिवोली येथील ज्येष्ठ मूर्तिकार पांडुरंग केशव आगरवाडेकर व त्यांच्या कन्या अक्षया आगरवाडेकर वडिलोपार्जित गणपती मूर्तिकलेचा व्यवसाय निष्ठेने चालवत आहेत. दरवर्षी त्यांच्या चित्रशाळेत शंभरेक गणपतीच्या मूर्ती बनतात.
वडील, काका वारले व पांडुरंग यांना एकट्याला हा व्यवसाय झेपेना म्हणून त्यांनी काही काळ मूर्ती बनवणे थांबवले. आता त्यांची मुलगी अक्षया फाईन आर्टची पदवी घेऊन बाहेर पडली व ती वडिलांसोबत मूर्ती बनवित आहे.
पर्यावरणपूरक मूर्ती पुजण्यासाठी जागृती
वैशाली चव्हाण म्हणतात, "गेल्यावर्षी मी तेलंगणा येथून विक्रीसाठी केवळ पाच इकोफ्रेंडली मूर्ती आणल्या होत्या. त्या दुसऱ्याच दिवशी विकल्या गेल्या. त्यामुळे यंदा ऑर्डर्स घेऊन मूर्ती उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. सत्तरी तालुक्यातील पर्ये गावातील कलाकार, पर्यावरणीय पुरस्कार प्राप्त सूर्यकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्ती बनवून आम्हाला देतात."
"आम्हाला पर्यावरणपूरक मूर्ती पूजण्यासाठी जागृती करायची आहे. इथल्या मातीतून सर्जनशील कलाकृती घडवणाऱ्या हस्तकारागिरांना कोरोना महामारीच्या या प्रतिकूल काळात वाव देण्याचा उद्देश आहे. आम्ही उपलब्ध करत असलेल्या मूर्ती शंभर टक्के इकोफ्रेंडली आहेत. त्याला रासायनिक रंग नाहीत. तसेच त्यांचे विसर्जन महामारीच्या परिस्थितीत घरात बादलीतही करता येईल," असे वैशाली चव्हाण यांनी सांगितले.
- नितीन कोरगावकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.