Vote  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election 2023 : साखळीत मतदारांना धमकावले; काही काळ तणाव

साखळीत प्रभाग तीनमधील घटना

विलास ओहाळ

साखळीत शुक्रवारी दुपारी पालिका निवडणुकीच्या मतदानावेळी काहीसा वातावरण गढूळ करण्याचा प्रकार घडला. पोलिस उपस्थित असतानाही दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ झाल्याने वातावरण अधिकच तापले.

दोन्ही बाजूंनी एकमेकांना बघून घेण्याचा आणि ‘वॉर्निंग’ देण्याचा प्रकारही घडला. हे प्रकरण नंतर हमरीतुमरीवर आले. शेवटी उमेदवारांनीच वाद घालणाऱ्यांना बाजूला करत आपापसांत समेट घडवून आणला.

दुपारी 12.45 च्या सुमारास प्रभाग क्रमांक तीनमध्ये मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतराच्या आत उमेदवारांच्या समर्थकांना थांबण्यास मनाई होती. परंतु काही लोक या क्षेत्रात थांबल्याची तक्रार आल्यामुळे क्षेत्रिय निवडणूक अधिकारी पोलिसांना घेऊन घटनास्थळी गेले.

मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत बसता येणार नाही, असे सांगत एका उमेदवार महिलेच्या समर्थकांना तेथून हटविले. त्याच दरम्यान दुसऱ्या एका महिला उमेदवाराचा समर्थक मतदारांना धमकावत असल्याचे कोणीतरी विरोधी महिला उमेदवारास सांगितले. त्यानंतर धमकावणाऱ्यास जाब विचारण्यास गेलेल्यांमध्ये बाचाबाची झाली.

जो व्यक्ती धमकावत होती, तो निलंबित झालेला पोलिस असल्याचे काही काळानंतर कळले. आपण जरी निलंबित असलो तरी शिवी देण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्या निलंबित पोलिसाचा होता.

...आणि सर्वजण भानावर आले

दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी या वाद घालणाऱ्या समर्थकांना पकडल्यामुळे त्यांना आणखीनच बळ आले. काही वेळ एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे हे प्रकरण हातघाईवर येणार, असे वाटत होते.

परंतु या ठिकाणी असलेल्या पत्रकारांनी हा प्रकार रेकॉर्ड केल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाद पुढे चिघळणार नाही, याची दक्षता घेतली. त्यानंतर दोन्ही महिला उमेदवारांनी काही झालेच नसल्यासारखे दाखविण्याचा प्रयत्न केला.

उमेदवारांचा लागणार कस

महिला राखीव असलेल्या प्रभाग तीनमध्ये दुरंगी लढत होत आहे. याठिकाणी एक अनुभवी आणि एका नवख्या उमेदवारामध्ये ही लढत रंगली आहे. या प्रभागात खासकरून भाजप प्रदेशाध्यक्षांनी लक्ष घातल्याचे बोलले जात असल्यामुळे ही लढत कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT