SCO बैठकीत नाही पण मुलाखतीत भुत्तोंनी आळवला 'काश्मीर' राग; म्हणाले ...तोपर्यंत भारताशी चर्चा नाही

SCO बैठकीनिमित्त भारतात आलेले भुत्तो काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Bilawal Bhutto India Visit
Bilawal Bhutto India VisitDainik Gomantak
Published on
Updated on

Bilawal Bhutto India Visit: गोव्यात झालेल्या दोन दिवसीय शांघाय सहकार्य बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी हजेरी लावली. 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांने भारताला भेट दिली. दोन्ही देशातील संबध तणावाचे असताना ही भेट महत्वाची मानली जात आहे. भारताने काश्मीरला विषेश दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर, पाकिस्तान आक्रमक झाले आहे.

दरम्यान, SCO बैठकीनिमित्त भारतात आलेले भुत्तो काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, बैठकीत नाही पण एका मुलाखतीत भुत्तो यांनी 'भारत आणि काश्मीरबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही' असे मत व्यक्त केले आहे.

गोव्यात झालेल्या बैठकीदरम्यान बीबीसीने घेतलेल्या मुलाखतीत बिलावल भुत्तो यांनी विविध मुद्यांवर त्यांची मते व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान यांच्या भविष्यातील संबधाकडे तुम्ही कसे पाहता असा प्रश्न भुत्तो यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी, भारताने 05 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय माघारी घेतला जात नाही तोपर्यंत द्विपक्षीय बैठक शक्य नसल्याचे भुत्तो यांनी सांगितले. तसेच, चर्चेसाठी पुरक वातावरण निर्माण करणे भारताची जबाबदारी असल्याचे भुत्तो म्हणाले.

पाकिस्तान शांघाय सहकार्य बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असून, यादरम्यान, कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय बैठक होणार नसल्याचे यापूर्वी आम्ही स्पष्ट केल्याचे भुत्तो यांनी स्पष्ट केले. तसेच, 'भारत आणि काश्मीरबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही' असे मत भुत्तो यांनी व्यक्त केले आहे.

Bilawal Bhutto India Visit
SCO Summit 2023: जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भुत्तो म्हणाले, 'आपल्या लोकांची सुरक्षा...'

पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यात पाकिस्तानचा संबध असल्याची शक्यता समोर आली आहे. याबाबत भुत्तो यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुत्तो यांनी देशाकडून किंवा सरकारकडून असा कोणताही आरोप केल्याचे समोर आले नाही. पाकिस्तान हिंसेचे केव्हाच समर्थन करत नाही. दहशतवादाचा मी देखील एक शिकार आहे. SCO सदस्य देशात पाकिस्तानने दहशतवादामुळे सर्वाधिक नुकसान सहन केले आहे. असे उत्तर भुत्तो यांनी दिले.

बिलावल भुत्तो पाकिस्तानचे पंतप्रधान देखील होऊ शकतात अशी शक्यता असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर भुत्तो यांनी निवडणुकीनंतर अशा प्रश्नांना अर्थ आहे असे भुत्तो म्हणाले.

Bilawal Bhutto India Visit
Bilawal Bhutto India Visit: नो शेकहँड, ओन्ली नमस्ते! बिलावल भुत्तोंचे जयशंकर यांनी असे केले स्वागत, पाहा व्हिडिओ

दरम्यान, शुक्रवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे जयशंकर म्हणाले. तर, 'आपल्या लोकांची सुरक्षा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राजनैतिक साधन म्हणून दहशतवादाला मुद्दा बनवण्यात अडकू नये' असे बिलावल भुत्तो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com