Sanquelim Municipal Council Election 2023 : बाचाबाची...शिवीगाळ... हमरीतुमरी आणि समेटही; साखळी @ 87.56

दोन्ही गटांच्या उमेदवारांना विजयाची खात्री
Sankhlim Municipality Election 2023
Sankhlim Municipality Election 2023Dainik Gomantak

साखळी पालिका निवडणुकीसाठी विक्रमी 87.56 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 96 टक्के मतदान प्रभाग क्र. 12 (विर्डी) येथे नोंद झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. केवळ क्र. 3 प्रभागातील हाऊसिंग बोर्ड येथे मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार व मतदार यांच्यात बाचाबाची झाली. हे प्रकरण नंतर मिटवण्यात आले.

सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांनी मतदानाला प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत मतदारांची गर्दी होती. दुपारी कडक ऊन व उकाड्यामुळे मतदान केंद्रांवर सामसूम होती.

संध्याकाळी 4 नंतर सर्वच प्रभागांमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. तसेच मतदान करून घेण्याची प्रक्रिया जलदपणे केल्याने लोकांना जास्त वेळ ताटकळत राहावे लागले नाही.

Sankhlim Municipality Election 2023
Anjuna Police Drugs Raid: ड्रग्स तस्करी प्रकरणी शापोरातील रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा, आली 'ही' माहिती उघडकीस

काही दिवस भाजपपुरस्कृत उमेदवारांनी केलेला प्रचार व त्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद मोठा आहे. आज सर्व मतदान केंद्रांवरील उत्साह पाहता या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून येतील, अशी अटकळ आहे.

विर्डीच्या प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक 96 टक्के मतदान. हाऊसिंग बोर्ड येथे किरकोळ तणाव.

उमेदवारांची प्रतिष्ठा मतपेटीत सीलबंद. मात्र, दोन्ही गटांच्या उमेदवारांना विजयाची खात्री.

‘टुगेदर फॉर साखळी’ सत्ता राखणार

साखळी नगरपालिका क्षेत्रात गेली दहा वर्षे ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाने सत्तेत राहून केलेली कामे लोकांना दिलेल्या विविध योजना व लोकांची केलेली सेवा या सर्वांची दखल घेऊन साखळीतील मतदार ‘टुगेदर फॉर साखळी’ या पॅनेलला कौल देतील.

ज्याप्रमाणे मतदार आणि विरोधी गटातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, त्या दबावाला जुगारून लोक ‘टुगेदर फॉर साखळी’ पॅनेलवरील विश्वास या मतदानातून व्यक्त करतील, अशी प्रतिक्रिया मावळते नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी व्यक्त केली.

Sankhlim Municipality Election 2023
SCO बैठकीत नाही पण मुलाखतीत भुत्तोंनी आळवला 'काश्मीर' राग; म्हणाले ...तोपर्यंत भारताशी चर्चा नाही

"साखळीतील सर्व दहाही जागांवर भाजपचे उमेदवार निर्विवादपणे विजयी होतील व पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला विकास व लोकांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास या निवडणुकीतून व्यक्त होणार आहे."

गोपाळ सुर्लकर, अध्यक्ष, साखळी भाजप मंडळ.

सायंकाळी 4 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

प्रभाग १ - ८०.८७%, ७३७ पैकी ५९६ मतदान
प्रभाग २ - ७४.६३%, ८१६ पैकी ६०९ मतदान
प्रभाग ३ - ८५.६०%, ६५३ पैकी ५५९ मतदान
प्रभाग ४ - ७७.१३ %, ८५७ पैकी ६६१ मतदान
प्रभाग ६ - ८०.३१%, ७७७ पैकी ६२४ मतदान
प्रभाग ७ - ८६.०८%, ४६७ पैकी ४०२ मतदान
प्रभाग ९ - ७४.१२%, ७०७ पैकी ५२४ मतदान
प्रभाग १० - ८१.७२%, ६२९ पैकी ५१४ मतदान
प्रभाग ११ - ८७.३२%, ६३९ पैकी ५५८ मतदान
प्रभाग १२ - ९०.४६%, ६५० पैकी ५८८ मतदान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com