Durbar Hall inaugurated in Raj Bhavan Goa Dainik Gomantak
गोवा

राजभवनातील दरबार हॉलचं उपराष्ट्रपतींकडून उद्धाटन

नव्या सरकारचा शपथविधी नव्या दरबार हॉलमध्येच होणार

दैनिक गोमन्तक

पणजी : माझ्या हृदयात गोव्याचे मोठे स्थान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असली तरीही गरिबी, निरक्षरता, भेदभाव ही आव्हाने कायम असल्याचं मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. राजभवनातील दरबार हॉलच्या उद्घाटनावेळी उपराष्ट्रपती नायडूंनी गोव्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. लोकमताचा आदर करण्यासाठी सहनशीलता हवी, असं मतही यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केलं. (Durbar Hall inaugurated in Raj Bhavan Goa News Updates)

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सध्या गोवा (Goa) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल गुरुवारी संध्याकाळी ते गोव्यात दाखल झाले. उपराष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचं उद्धाटन करण्यात आलं आहे. या हॉलमध्ये यापुढे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. महत्त्वाचे सरकारी कार्यक्रम याच हॉलमध्ये घेतले जातील. याआधी सर्व कार्यक्रम जुन्या दरबार हॉलमध्ये घेतले जात होते. मात्र आता ते सर्व कार्यक्रम सुसज्ज अशा नव्या हॉलमध्ये घेतले जातील.

गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा (Goa Assembly Election) निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधीही याच दरबार हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. हा दरबार हॉल राज्यातील दुसरा सर्वात मोठा हॉल असल्याचंही बोललं जात आहे. शपथविधीनंतर शासकीय कार्यक्रमांसाठी राज भवनातील (Raj Bhavan) हा हॉल वापरला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT