युक्रेनमध्ये अडकलेला कुडतरीचा जोमार्क पोलंडला पोहोचला

नोकरीच्या शोधात युक्रेनला गेलेल्या गोमंतकीय तरुणाची युद्धात सापडल्याने गोची
Goan Youth Stucked in Ukraine
Goan Youth Stucked in Ukraine Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : नोकरी करण्याच्या निमित्ताने फक्त पाच महिन्यापूर्वीच युक्रेनच्या गेलेला आणि तिथे गेल्यावर युद्धात अडकून पडलेला कुडतरी येथील जोमार्क डायस हा 22 वर्षीय गोमंतकीय युवक सध्या युक्रेनची सीमा ओलांडून पोलंड देशात पोहोचल्याने त्याच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आहे. (Goan Youth Stucked in Ukraine News Updates)

Goan Youth Stucked in Ukraine
पर्यटकांची पावले वळली दक्षिण गोव्याकडे

जोमार्कची आई मारिया डायस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 'देवाच्या दयेने माझा मुलगा पोलंड मध्ये सुखरूप पोहोचला आहे. पण तो लवकरात लवकर गोव्यात पोहोचावा हीच आमची इच्छा आहे. पैशांच्या अभावी तो पोलंडमध्ये (Poland) अडकून पडू नये यासाठी आम्ही त्याच्यासाठी पैशांची सोयही केली आहे',असे तिने सांगितले.

आपले नशीब आजमावण्यासाठी तो युक्रेनला नोकरीच्या शोधात गेला होता पण त्याच्या वाईट नशिबाने तो या युद्धात सापडला.

Goan Youth Stucked in Ukraine
मडगावची अनेस्का आणि फोंड्याची कॅरन सुखरुप गोव्यात परतल्या

दरम्यान बोर्डा मडगाव (Madgaon) येथील अनेक्सा फेर्नांडिस आणि फोंड्याची कॅरन फर्नांडिस या युक्रेनला अडकून पडलेल्या दोन गोमंतकीय विद्यार्थीनी आज सुखरूप गोव्यात (Goa) पोहोचल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. आपली मुले युद्धभूमीत अडकल्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com