...भाजप विरोधात लढलेल्या पक्षांना काँग्रेस सरकारात स्थान; गिरीश चोडणकर

भाजप कडून काँग्रेसचे फोन टॅपिंग होत असल्याचा खळबळजनक आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात गोवा विधानसभा मतदान (Goa Assembly Election 2022) 14 फेब्रुवारीला पार पडली असुन, 10 मार्चला राज्यात मतमोजणी होणार आहे. आज गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान भाजप कडून काँग्रेसचे फोन टॅपिंग होत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला, आणि याच पार्श्वभूमीवर गिरीश चोडणकर यांच्यासोबत गोमन्तकने संवाद साधला असता ते म्हणाले की, आम्हाला गोवेकरांवर पुर्ण भरोसा असून जनता आम्हाला निवडून देईल असा विश्वास त्यांनी गोवेकरांना वर दाखवला.(Statement of Girish Chodankar against Goa BJP)

Girish Chodankar
मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यासाठी MUCB कडुन लॉकरधारकांना अंतिम सूचना

दरम्यान, "भाजप सरकारवर (Goa BJP) राज्य आर्थिक गैरव्यवस्थापनाचा आरोप करत त्यांनी गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस (Goa Congress) हा बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आम्हाला गरज पडल्यास आम्ही भाजप विरुद्ध लढलेल्या सर्व पक्षांना आमच्या सरकारात स्थान देऊ असे म्हणत चोडणकरांनी भाजपला सडकून उत्तर दिले."

आम्ही गोवेकरांना जिंकण्यासाठी ही निवडणूक लढवली आहे.

ते पुढे म्हणाले, "आम्ही गोवेकरांना जिंकण्यासाठी ही निवडणूक लढवली आहे, इतर पक्षांप्रमाणे केवळ निवडणुक जिंकण्यासाठी नाही या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत गोव्याचे नागरिक हा आमचा केंद्रबिंदू होता काँग्रेसने वेळोवेळी घेतलेल्या ठाम निर्णयामुळेच नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे.

नागरिकांची मते विचारात घेऊनच आम्ही पुन्हा नव्याने कॉंग्रेसची स्थापन केली. गोवेकरांना या निवडणुकीत आम्ही नवीन उमेदवार दिले गोवेकरांना जो बदल हवा होता, तो बदल विचारात घेऊन आम्ही जाहीरनामा तयार केला आहे. ते पुढे म्हणाले, भाजप आमच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही भाजपला उघड पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आम्हाला टॅपिंग करण्याची गरज नाही आम्हाला विचारा आम्ही तोंडावर उघड पणे सांगू असे खुले आव्हान त्यांनी (Girish Chodankar) केले आहे. "

भाजपने आमचे नेते पळवले

" भाजपने आमचे नेते पळवले, भाजप मध्ये जे अपक्ष उमेदवार सामील झाले त्यांची अवस्था काय आहे हे गोवेकर उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. इतिहास साक्षीदार आहे या सर्व गोष्टींना प्रतापसिंह राणे यांनी ही निवडणूक लढवू नये याकरिता भाजपने कुरघोड्या करण्याची चूक केल्याचे ही ते म्हणाले, तसेच मी काँग्रेस पक्षाचा सेवक म्हणून काम करत असून आज पर्यंत मी पक्षाकडे कोणतेही पद मागितले नाही आणि मला कोणत्याही पदाची अपेक्षा देखील नाही."

निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्ष चंद्र आणि सुर्य आणून देण्याची भाषा करीत असतात, आत्ता घोडे मैदान लांब नाही कारण राज्यात गोवा विधानसभा निवडणूक 14 फेब्रुवारीला पार पडली असुन, 10 मार्चला राज्यात मतमोजणी पार पडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com