stop smoking  Dainik Gomantak
गोवा

Unemployment Rate: बेरोजगारीला कंटाळून युवा पिढी व्यसनाच्या अधीन; गोव्यात 6,529 जणांवर उपचार

Goa Addiction Cases: आयपीएचबीमध्ये ३० महिन्यांच्या काळात अमलीपदार्थांचे (ड्रग्ज) व्यसन असणाऱ्या २१० जणांनी उपचारासाठी नोंदणी केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात वाढत असलेल्या बेरोजगारीला कंटाळून अनेक युवा पिढी व्यसनाच्या अधीन जात आहेत. हा व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. यामध्ये मद्य, अमलीपदार्थ, तंबाखू चघळणे अशा विविध व्यसनांचा समावेश आहे.

जानेवारी २०२२ ते जून २०२४ या ३० महिन्यांच्या दरम्यान सरकारी इस्पितळांत एकूण ६,५२९ जणांनी उपचार घेतले आहेत. राज्यातील विविध सरकारी इस्पितळांत अनेकजण व्यसनाधीनता सोडवण्यासाठी रुग्ण उपचार घेत आहेत.

जानेवारी २०२२ ते जून २०२४ या ३० महिन्यांच्या मानसोपचार इस्पितळात (आयपीएचबी) मद्यपानाचे व्यसन सोडवण्यासाठी एकूण १,२२२ जणांनी नोंदणी केली होती. यांतील ४५५ जणांवर इस्पितळात भरती करून उपचार करण्यात आल्याची माहिती विधानसभा अधिवेशनात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरातून समोर आली आहे. यासंदर्भात विरेश बोरकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ती दिली आहे.

आयपीएचबीमध्ये ३० महिन्यांच्या काळात अमलीपदार्थांचे (ड्रग्ज) व्यसन असणाऱ्या २१० जणांनी उपचारासाठी नोंदणी केली होती. यापैकी १०६ जणांना उपचारासाठी इस्पितळात भरती करून घेण्यात आले होते. म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात एकूण २,१४५ रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये सर्वाधिक ७९३ रुग्ण हे मद्याच्या आहारी गेलेले होते. ६३३ रुग्णांना तंबाखूचे, १३२ रुग्णांना ओपीऑइडचे, तर ८५ जणांना गांजाचे व्यसन होते.

दक्षिण गोव्यात २८५८ व्यसनमुक्त

दक्षिण गोव्यात एकूण २,८६८ जणांनी व्यसनमुक्त होण्यासाठी किंवा अमलीपदार्थांचे व्यसन सोडवण्यासाठी उपचार घेतले. यातील २,५७४ जणांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार घेतले. २९४ जणांनी मडगाव येथील टीबी इस्पितळात उपचार घेतले. अडीच वर्षांत सर्वाधिक १,२९२ रुग्ण हे २०२३ या एका वर्षातील होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT