Pernem Water problem Dainik Gomantak
गोवा

Pernem Water Problem: नियोजनाअभावी पेडण्यात पाणीसंकट; जनता हैराण

दररोज हवे 22 एमएलडी पाणी, प्रत्यक्षात 15 एमएलडीचाच पुरवठा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Pernem Water Problem: पेडणे तालुक्यातील जनतेची तहावृन भागवण्यासाठी दररोज किमान 22 एमएलडी पाण्याची गरज आहे.

पेडणे तालुक्यातील वीस ग्रामपंचायत एक नगरपालिका या क्षेत्रामध्ये एकूण साडेअठरा हजार नळ जोडणी ग्राहक तर केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत एक हजारपेक्षा जास्त नळ जोडण्या आहेत.

या सर्वांना दर दिवशी 22 एमएलडीची गरज असताना साबांखाच्या पाणी विभागाकडून 15 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. नियोजनाअभावी पाणी संकट ओढवल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

लाखभर लोकसंख्या असलेल्या पेडण्यात पर्यटन हंगामात, उत्सवांनिमित्त पर्यटक आणि नातेवाईक ये जा करत असतात. त्यांनाही पाण्याची आवश्यकता असते.

चांदेल विस्तारित १५ एमएलडी पाणी प्रकल्पाला २०१९ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, याभागात दीडशे झाडे असल्याने ही झाडे कापण्यास वन विभागाने विलंब लावल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. दोन अभियंते, काम चौघांचे?

पेडणे तालुक्यासाठी पूर्णपणे पाण्याची सोय करण्यासाठी पाणी विभागाकडे पूर्वी चार अभियंते होते. सध्या दोन अभियंते आहेत. त्यातील संदीप मोरजकर हा अभियंता कायमस्वरूपी सेवेत आहे.

तर दुसरा अभियंता गौरीश ठाकूर हा सोसायटीच्या अंतर्गत नियुक्त आहे. आणखी दोन अभियंत्यांची गरज असूनही सरकारने नियुक्ती केलेली नाही. परिणामी नियोजन होत नाही.

नवीन 14 टाक्यांची उभारणी

पेडणे तालुक्यातील विविध गावांत २४ नवीन टाक्या उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वारखंड, तोर्से, ओझरी, हरमल, पत्रादेवी, धारगळ, नागझर, तुये हॉस्पिटल, मुरमुसे, पराष्टे, तुये आयडीसी, कासारवर्णे, हणखणे, उगवे, इब्रामपूर, तोर्से हरिजन वाडा, आगरवाडा, मालपे दाडाचीवाडी धारगळ आदी ठिकाणी टाक्या उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातील १४ टाक्या पूर्ण झालेल्या आहेत.

फकीरपाटा येथे लघुबंधारा बांधल्यास तिथे बाजुच्या फकीरपाटा येथे १५ एमएलडीचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारून मोपा विमानतळ व परीसर भाग वगळून पेडणे शहर आणि तोर्से, तांबोसे मोपा (गाव), उगवे, वारखंड, पोरस्कडे, नईबाग आणि संपूर्ण पेडणे शहर व परीसर यासाठी पुढे ५० वर्षे पुरेल, अशी पाण्याची तजवीज करता येते.

- व्यंकटेश नाईक

सरकारने कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे, हे सरकारवर अवलंबून आहे. रस्ते, वीज, रोजगार, पाणी इत्यादी अति महत्त्वाच्या गोष्टीला सरकार प्राधान्य देताना दिसत नाही. नको तिथे पैसा खर्च होतो. त्यामुळे आज पेडणे तालुक्यामध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.

- भारत भागकर, अध्यक्ष पेडणे तालुका नागरिक समिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT