Ganje Embankment Dainik Gomantak
गोवा

Mhadai River: म्हादई नदीवरील गांजे बंधाऱ्यामुळे शेतकरी 'बेहाल'; जलस्रोत खात्याकडून उपाययोजनाच नाही!

Ganje Embankment: कडा कोसळल्याने गुळेली परिसरातील आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी हा बंधारा छोटा होता.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादई नदीवर गांजे येथे सर्वात मोठा बंधारा गेल्या काही वर्षांपासून उभा आहे. उन्हाळ्यात बंधाऱ्यामुळे म्हादई व रगाडा नद्या काठोकाठ भरत असल्याने दोन्ही बाजूच्या नदीच्या कडा भुसभुशीत होत आहेत आणि पाऊस सुरू होऊन नदीला पाणी आले की या पाण्याच्या प्रवाहाबरोबर या कडा मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. कडा कोसळल्याने गुळेली परिसरातील आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी हा बंधारा छोटा होता.

गेल्या दोन वर्षांपासून त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नसली तरी म्हादई व रगाडा नदीकिनारी असलेल्या शेतकाऱ्यांची यामुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यांना चांगल्या सुपीक जमिनीला मुकावे लागत आहे. नदीकिनारी केलेले उत्पन्न हे या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना पाहण्याखेरीज हे शेतकरी काहीच करू शकत नाहीत. जलस्रोत खात्याला या भागातील शेतकऱ्यांनी याविषयी अनेक निवेदने दिली आहेत; परंतु दरवर्षी फक्त आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळालेले नाही .

फक्त आश्‍वासनांची खैरात

गुळेली भागातील एक शेतकरी यशवंत बाबलो सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून रगाडा नदीलगत असलेली त्यांची बागायती या कारणांमुळे कोसळत आहे. यासाठी जलस्रोत खात्याला निवेदन दिले. त्यांनी पाहणी करून या ठिकाणी नदीचे कठडे बांधण्यासाठी तयारी केली आहे; परंतु गेली दोन-तीन वर्षे फक्त प्रत्येक अधिकाऱ्याकडून आपल्याला आश्वासनेच मिळत आहेत.

योजनांचा हेतू फसतोय!

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही योजना किंवा ‘वसंत बंधारे’ ही योजना चांगलीच आहे. तिचा लाभ हा या भागातील शेतकऱ्यांना होतोच; परंतु याच योजनेमुळे आमची जमीन जर अशाप्रकारे नदीच्या प्रवाहात दरवर्षी कोसळत राहिली तर या योजनेचा हेतू तरी सफल होईल का? असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT