Due to the defeat of Babu Kavalekar in the assembly, the issues of Dhangar community are on the table  Dainik Gomantak
गोवा

'धनगर समाजाचा विधानसभेतील आवाज थंडावणार'

आदिवासी दर्जा विषय अधांतरीच

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले - गोव्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यात दिवस काढून काही वर्षांपासून विकसित भागात स्थायिक झालेल्या राज्यातील आदिवासी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती दर्जा देण्याचा विषय अधांतरीच राहिला असून, त्यात या विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या 20 वर्षांपासून विधानसभेत या विषयावर आवाज उठवणारे धनगर समाजाचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा पराजय झाला असल्याने विधानसभेतील आवाजही थंडावणार यांची चिंता धनगर समाजाला सतावू लागली आहे.

राज्यात सन 2003 साली धनगर समाजाला वगळून इतर तीन समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला होता, तेव्हा पासून या दर्जाचा खरा हक्कदार असलेला धनगर समाज एकाकीपणे लढा देत आहे, या लढ्यात फार महत्त्वाचा वाटा या समाजाचे नेते तथा केपे मतदार संघातून निवडून येणारे बाबू कवळेकर यांचा होता.

धनगर समाजाला न्याय द्यावा म्हणून गोवा विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात ते या विषयावर आवज काढीत होते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हा विषय पुढे गेला होता, त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक, माजी सबांखा मंत्री दिपक पाऊसकर, राज्य सभा खासदार विनय तेंडुलकर आणि धनगर समाजातील काही पुढारी शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा, आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा तसेच केंद्रीय रजिस्टर जनअरल ऑफ इंडिया या संस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली होती.

त्यानंतर या प्रकरणी सरकारच्या आदेशानुसार समाज कल्याण खात्याच्या वतीने धनगर समाजाच्या या विषयावर तातडीने हालचाली करून सविस्तर अहवाल गोळा करण्याचे काम सुरू केले होते, परंतू त्या नंतर काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकीची (Assembly Election) आचारसंहिता लागू झाल्याने सदर प्रक्रियेमध्ये खंड पडला होता, आणि आता राजकिय पातळीवर सदर विषय लावून धरण्यासाठी विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे बाबू कवळेकर हे नसल्याने या विषयांचे पुढे काय होणार, हा मोठा प्रश्न धनगर समाजा समोर उभा राहिला आहे. परंतु धनगर समाजाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांचा जरी पराभव झाला असला तरी त्याच्या पक्षाचे सरकार स्थापन होत असल्याने ते पक्षीय पातळीवरून धनगर समाजाचा विषय पुढे नेणार एवढाच आशेचा किरण दिसत आहे.

या संबंधी गोवा (goa) धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आता पर्यंत धनगर समाजाने खुप संयम बाळगून सत्तेवर येणाऱ्या सरकारकडे न्याय देण्याची मागणी केली आहे, परंतू 20 वर्षं झाली तरी धनगर समाजाला न्याय मिळत नाही, यांचें दुःख वाटते, धनगर समाजाचे नेते बाबू कवळेकर यांचा पराजय झाल्या मुळे धनगर समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे, परंतू ते जरी विधानसभेत नसले तरी त्यांच्या पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना या विषयी सविस्तर माहिती आहे, त्यामुळे आता तरी वेळ न काढता धनगर समाजाच्या या विषयाला चालना देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT