sri lanka financial crisis latest news tamils are fleeing to india citing economic crisis and unemployment
sri lanka financial crisis latest news tamils are fleeing to india citing economic crisis and unemploymentDainik Gomantak

श्रीलंकेत उपासमार, लोक देश सोडून भारतात

श्रीलंकेत बेरोजगारी पोहोचली शिगेला
Published on

अनियंत्रित महागाई आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत लोकांना आपला देश सोडावा लागत आहे. हे लोक आपला देश सोडून भारतात जात आहेत. मंगळवारी 16 श्रीलंकन ​​तमिळ नागरिकांनी आपला देश सोडला आणि भरपूर पैसे देऊन बोटीने तामिळनाडू (Tamil Nadu) किनारपट्टी गाठली. या लोकांमध्ये चार महिन्यांच्या नवजात बालकाचाही समावेश आहे.

श्रीलंकेतील जाफना आणि तलाईमन्नार येथील हे लोक दोन गटात तामिळनाडूत पोहोचले. पहिल्या गटात तीन मुलांसह सहा जणांचा समावेश होता. श्रीलंकेतील या लोकांमध्ये चार महिन्यांचा मुलगा देखील होता. हे सर्व लोक फायबर बोटीतून किनारपट्टीवर पोहोचले जेथे तटरक्षक दलाने त्यांची सुटका केली. दुसऱ्या गटात पाच मुले आणि तीन महिलांसह 10 जणांचा समावेश होता. 6 जणांच्या गटाने भारतातील अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. बेरोजगारीही (Unemployment) शिगेला पोहोचली आहे, म्हणून त्यांनी आपला देश सोडला.

sri lanka financial crisis latest news tamils are fleeing to india citing economic crisis and unemployment
यासीन मलिक आणि बिट्टा कराटेवर पुन्हा खटले होणार सुरू

प्राथमिक चौकशीत ते जाफना आणि तलाईमन्नार येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व सहा श्रीलंकन ​​तामिळ नागरिक रात्री दहाच्या सुमारास श्रीलंकेतून एका बोटीत बसले. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली. ज्या खलाशीने त्यांना आणले होते त्याने लोकांना एका छोट्या बेटावर सोडले.

भारतीय तटरक्षक दलाने मंडपम येथे एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये श्रीलंकेतून येणाऱ्या कुटुंबांना माहिती देण्यात आली होती. सर्व लोकांची ओळख पटल्यानंतर त्यांना मंडपामध्ये आणून त्यांची चौकशी करण्यात आली, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सर्व श्रीलंकन ​​(Sri Lanka) नागरिकांना रामेश्वरमजवळील मंडपम येथील निर्वासित छावणीत हलवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या हवाल्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com