Bad Roads At Ponda  Dainik Gomantak
गोवा

Ponda News: फोंड्यात रस्त्यांचे वाजले तीन-तेरा; सतत खोदकाम

Ponda Roads: १० वर्षे चाललेय ‘एसटीपी’ प्रकल्पाचे काम; नियोजनाचा अभाव

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्यातील मलनि:स्सारण ‘एसटीपी‘ प्रकल्पामुळे रस्त्यांचे तीन-तेरा वाजले आहेत. मात्र त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतोय. हे रस्ते दुरुस्त केले, हॉटमिक्स डांबरीकरण केले म्हणून उद्या ते शाबूत राहतीलच, असेही नाही. कारण नियोजनाचा अभाव. या विकासकामांबाबत कोणतेच नियोजन नसल्याने फोंड्यातील मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम गेली दहा वर्षे चालले आहे.

फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी फोंडा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना आवश्‍यक विकासप्रकल्पही उभारले. मात्र विकास ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहणारी असल्याने रस्ते, पाणी आणि विजेची कामे ही कायम सुरूच असतात. फोंड्यात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी शहर आणि इतर परिसरातील रस्‍ते खोदण्यात आलेले आहेत.

त्यापूर्वी मलनि:स्सारण प्रकल्पामुळे रस्त्यांची स्‍थिती दयनीय झाली होती. नंतरच्या काळात आला घरगुती गॅसवाहिनीचा प्रकल्प. त्यासाठी नव्याने रस्त्याचे खोदाई. इकडे रस्त्यांचे डांबरीकरण केले जाते, तिकडे या कामांसाठी रस्ते पुन्हा खोदले जातात. शेवटी प्रत्येक खाते आणि संबंधित कंत्राटदारामध्‍ये समन्वय असावा लागतो, जो फोंड्यातील या कामांमध्‍ये दिसत नाही.

रस्‍ते खोदले, अपघात वाढले

मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे. वास्तविक हे काम तीन वर्षांत पूर्ण व्‍हायला हवे होते. पण एवढी वर्षे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागल्याने त्याचा फटका रस्त्यांना बसला आहे. वास्तविक मलनि:स्सारण प्रकल्प ही काळाची गरज आहे. पुढील काळात अशा प्रकल्पाची आवश्‍यकता आहेच. पण या प्रकल्पाच्या वाहिन्‍या टाकण्यासाठी आणि चेंबर बांधण्यासाठी रस्ते मधोमध खणण्यात आले आहेत. त्‍यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

विठ्ठल जयराम नाईक, कुर्टी-फोंडा

मलनि:स्सारण प्रकल्पासोबतच घरगुती गॅसवाहिनी आणि भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी अजूनही फोंड्यातील रस्ते खोदण्यात येत आहेत. भल्या मोठ्या विहिरी आणि त्यासुद्धा रस्त्याच्या मधोमध खणण्यात आल्याने रस्त्यांची पार दुर्दशा झालेली आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे, पण काही ठिकाणी अजून सुरूच आहे.

एकनाथ शिवा सिमेपुरुषकर, वरचा बाजार-फोंडा

फोंड्यात अनेक विकास प्रकल्प उभे राहिले. अद्ययावत आयडी उपजिल्हा इस्पितळ, सरकारी संकुल, राजीव गांधी कला मंदिर, फोंडा शहराला मध्यवर्ती ठेवून उभारलेले बगलमार्ग, कुर्टीतील क्रीडांगण प्रकल्प, जलतरण तलाव अशी किती तरी कामे झाली. पण सध्‍याच्‍या कामांमध्‍ये नियोजनाचा पूर्ण अभाव दिसतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT