Ponda News: घराच्या प्रश्‍नावरून मायलेकाचे आंदोलन

Goa News: फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन
Goa News: फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन
Ponda Protest For Safety Of House Dainik Gomantak

भोम - हडकोण पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एकमध्ये आपल्या घराच्या अगदी जवळून शेजाऱ्याने बांधकाम केल्याने आपल्या घराला धोका निर्माण झाल्याचे सांगत याप्रकरणी आपल्याला फोंडा गटविकास अधिकारी तसेच मामलेदारांनी न्याय द्यावा, अशी मागणी भोम येथील एक ज्येष्ठ महिला प्रेमा कांता नाईक व तिचा मुलगा सुरेश कांता नाईक यांनी केली आहे.

प्रेमा नाईक व सुरेश नाईक या दोघांनीही फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले.

आपण या प्रकरणी स्थानिक पंचायतीकडे दाद मागितली होती, पण अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता गटविकास अधिकारी तसेच मामलेदारांनी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला योग्य न्याय द्यावा, असे प्रेमा नाईक यांनी सांगितले.

Goa News: फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन
Illegal Houses Demolished: सांगोल्डात विरोध धुडकावून 15 बेकायदा घरे जमीनदोस्त; अनेकांना अश्रू अनावर

सुरेश नाईक यांनी आपल्या कुटुंबात तेरा सदस्य असून सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष न घातल्यास सर्व कुटुंबियांना घेऊन फोंड्यातील सरकारी संकुलाजवळ धरणे धरू असा इशारा दिला.

दरम्यान, फोंडा गटविकास अधिकारी आश्‍विन देसाई यांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेतली आहे. आपण याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले व भोम अडकोण पंचायतीला आवश्‍यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com