Ponda News: फोंड्यात खोदकामामुळे रस्त्यांची चाळण

Goa Roads: अपघातांची भिती, जलवाहिन्या फोडण्याचे प्रकारही वाढले
Goa Roads: अपघातांची भिती, जलवाहिन्या फोडण्याचे प्रकारही वाढले
Goa Ponda RoadsDainik Gomantak
Published on
Updated on

पालिका क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती सध्या नाजूक आहे. खोदकामामुळे बहुतेक रस्त्यांची स्थिती बिघडली आहे. रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, हॉटमिक्स वगेरे करायचे आणि लगेच दुसऱ्या दिवशी हे रस्ते फोडायचे हे सत्र सातत्याने सुरू आहे.

भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम असू द्या, मलनिस्सारण प्रकल्पाचे काम असू द्या कि गॅसवाहिनीचे काम असू द्या, कुठला रस्ता कधी खोदण्यात येईल आणि लोकांचे कसे हाल केले जातील, हे सांगता यायचे नाही.

मलनिस्सारण प्रकल्पाचे कामे गेली दहा वर्षे सुरू आहे. घरगुती गॅसवाहिनी टाकण्याचे काम तर गेली पाच वर्षे सुरू आहे. अलीकडच्या काळात सुरू झालेले भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामासाठी जागोजागी खोदकाम सुरू आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम संपले असल्याचे सांगण्यात येते, पण कुर्टी भागात हे काम अजूनही सुरूच आहे. ही कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत रस्त्यांची स्थिती तशीच राहणार आहे.

गटारांची स्वच्छता पालिकेने केली आहे, त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार कमी आहेत. तरीही काही ठिकाणी गटारांचे बांधकाम नव्याने करण्याची गरज आहे.

फोंड्यात धोकादायक इमारती...

फोंडा पालिका क्षेत्रात धोकादायक बऱ्याच इमारती उभ्या आहेत. या इमारती कधी कोसळून पडतील, सांगता यायचे नाही. काझीवाडा ते वरचा बाजार आणि पुढे बेतोडा रस्त्यापर्यंत धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. काही धोकादायक इमारतीत अजूनही काही दुकाने सुरू आहेत. वरचा बाजार बेतोडा रस्ता तिठ्यावर एका शाळेची जीर्ण इमारत धोकादायक स्थितीत उभी आहे, ही इमारत खाली करण्यात आली आहे, मात्र ही इमारत कोसळल्यास येथील रस्त्यावरून जाणाऱ्यांना इजा होऊ शकते. दादा वैद्य चौकालगतची शास्त्री सभागृह इमारत धोका असल्याने पालिकेने पाडली. मात्र इतर धोकादायक इमारतींबाबत पालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही.

Goa Roads: अपघातांची भिती, जलवाहिन्या फोडण्याचे प्रकारही वाढले
Ponda Crime: फोंड्यातील निरंकाल भागात बिबट्याचा धुमाकूळ; कुत्र्यांचा पाडला फडशा

जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढले

फोंडा तसेच कुर्टी भागात अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. या खोदकामावेळी जलवाहिन्या फोडण्यात येत असल्याने स्थानिकांचे पाण्याअभावी हाल होतात. यावर सरकारने नियंत्रण आणणे आवश्‍यक आहे.

Goa Roads: अपघातांची भिती, जलवाहिन्या फोडण्याचे प्रकारही वाढले
Ponda Theft News: चोरट्यांनी फोडली एकाच इमारतीतील बारा दुकाने

आनंद नाईक, नगरसेवक

फोंड्यातील रस्त्यांचे वेळोवेळी हॉटमिक्स डांबरीकरण केले जाते. आमदार तथा मंत्री रवी नाईक हे येथील रस्त्यांकडे सातत्याने लक्ष देतात, परंतु काही कारणाने रस्ते पुन्हा फोडले जातात, त्यावर नियंत्रण असायला हवे.

विराज सप्रे, सामाजिक कार्यकर्ता, फोंडा

फोंड्यातील रस्त्यांचे खोदकाम गेली दहा वर्षे सुरू आहे, पण काम पूर्ण झाल्याचे कधी ऐकिवात नाही. या कामाचे नियोजन करण्याची गरज आहे. घिसाडघाईने काम उरकण्याच्या कंत्राटदारांच्या बेपर्वा वृत्तीचा फटका सर्वसामान्य नागरिकाला बसतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com