Flight  Internet
गोवा

Punjab: अमृतसरवर धुक्याचे जाळे! गोवा आणि कोलकाताला जाणारी विमान उड्डाणे रद्द

दिल्लीहून आलेले एअर इंडियाचे विमान धावपट्टी दिसत नसल्याने सुमारे 20 मिनिटे अमृतसर शहरावरती प्रदक्षिणा घालत राहिले.

Pramod Yadav

पंजाबमधील अमृतसरमध्ये धुक्यामुळे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. गुरुवारी सकाळपासून शहरात धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. याचा थेट परिणाम विमान उड्डाणांवर झाला आहे. श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा आणि कोलकाता येथे जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तत्पूर्वी, बुधवारी रात्री 10 वाजता दिल्लीहून आलेले एअर इंडियाचे विमान धावपट्टी दिसत नसल्याने सुमारे 20 मिनिटे अमृतसर शहरावरती प्रदक्षिणा घालत राहिले. तर, सहा विमाने उशिरा पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10 वाजता एअर इंडियाचे विमान अमृतसर विमानतळावर पोहोचले. विमानतळावर इतके दाट धुके होते की विमानाच्या पायलटला धावपट्टीच दिसत नव्हती. यामुळे विमानाच्या पायलटने सुमारे 20 मिनिटे शहराभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर विमानाचे यशस्वीरित्या लँडिग केले. तसेच, धुक्यामुळे मुंबईहून अमृतसरला येणारे एक आणि इटलीहून येणारे एक विमान दिल्ली विमानतळावर वळवावे लागले.

धुक्यामुळे गोवा आणि कोलकाताला जाणारी उड्डाणे रद्द करावी लागली. तसेच, दोहाहून येणारे कतार एअरवेजचे विमान पहाटे 2.30 ऐवजी 12.11 वाजता श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. शारजाहून अमृतसरला येणारे एअर इंडियाचे फ्लाइट (IX138) 54 मिनिटे तर, दुबईहून अमृतसरला येणारे स्पाइस जेटचे विमान सुमारे पाच तास उशिराने आले. तसेच पुण्याहून अमृतसरला येणारे विमान पहाटे 5:20 ऐवजी 5:20 वाजता उतरले. मुंबईहून अमृतसरला येणारी दोन विमानेही काही तास उशिराने अमृतसरला पोहोचली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT