Milind Naik Dainik Gomantak
गोवा

विकास कामामुळे मिलिंद नाईकांची कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचारात मुसंडी

मुरगावचा आणखी विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला संधी देण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मुरगावचे भाजप उमेदवार तथा आमदार मिलिंद नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचारात मुसंडी मारली आहे. आमदार नाईक यांनी मुरगावात केलेल्या विकास कामांमुळे त्यांना सर्व स्थरातून प्रतिसाद लाभत आहे.

मुरगांवचे भाजप उमेदवार मिलिंद नाईक यांनी सडा, एम पी टी कॉलनी, रूमडावाडा, बोगदा, बायणा, हाऊसिंग कॉलनी व इतर भागात आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी भेटी घेऊन मतदारांशी संपर्क साधला आहे. मुरगावात नाईक याना वाढता प्रतिसाद लाभत आहे.

भाजप उमेदवार मिलिंद नाईक (Milind Naik) सोबत सडा, जेटी, बोगदा भागात मुरगाव पालिकेच्या नगरसेविका मंजुषा पिळणकर, मृणाली पार्सेकर, नगरसेवक दयानंद नाईक, नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेवक दामू नाईक, शंकर रामचंद्र कामत, मुरगाव भाजप उपाध्यक्ष शशिकांत परब व इतर कार्यकर्ते घरोघरी प्रचारात सहकार्य करीत आहे.

भाजप उमेदवार मिलिंद नाईक यांनी घरोघरी भेटी देताना मुरगावात (Mormugao) साधलेला विकास कामाची माहिती दिली. तसेच पुढील कार्यकाळात मुरगावचा आणखी विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला संधी देण्याची मागणी केली. भाजप (BJP) उमेदवार नाईक यांना घरोघरी प्रचारात मुरगावात अग्रेसर असून लवकरच कोपरा बैठका जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुरगाव भाजप मंडळाकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT