Dudhsagar Waterfall Trekking Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Tourism: दूधसागर टूर ऑपरेटर वाद तूर्त निवळला; धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?

Dudhsagar Waterfall Trekking: भविष्यात GTDC, गोवा वन विकास महामंडळ आणि जीप ऑपरेटर्स असोसिएशन यांच्यात संयुक्त करार होणार आहे.

Pramod Yadav

कुळे: गोव्यात गेलेला पर्यटक दूधसागरला भेट न देता माघारी येणं निराळाच. गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेला हा धबधबा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून हा या धबधब्यावरील पर्यटन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

दूधसागरचा वाद येथील टूर ऑपरेटर्स आणि गोवा पर्यटन महामंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन बुकिंगरुन होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या समस्येवर तूर्त मार्ग निघाला आहे.

दूधसागर जीप ऑपरेटर्सची काय होती मागणी?

दूधसागर जीप ऑपरेटर्सनी गोवा वनविकास महामंडळाद्वारे ऑनलाईन बुकिंग थांबविण्यासाठी आणि त्यांची बुकिंग वेबसाईट सरकारकडे परत देण्याची मागणी केल्याने गेल्या आठवड्यापासून ऑपरेटर्स आक्रमक झाले आहेत. तसेच, GTDC चे काऊंटर बंद करण्याची मागणी ऑपरेटर्सनी केली होती. विविध नेत्यांनी ऑपरेटर्सच्या आंदोलनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र, यश आले नाही. अखेर ऑपरेटर्स त्यांच्या मागण्या घेऊन साखळी उपोषण करु लागले.

माजी खासदार विनय तेंडुलकरांनी शिष्टाई करुन तात्पुरते ऑफलाईन बुकिंग सुरु केले, पण ऑपरेटर्स त्यांच्या मागणीवर ठाम राहिले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय निर्णय झाला?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दूधसागर जीप ऑपरेटर्स यांची साखळीतील रवींद्र भवन येथे झालेल्या बैठकीत GTDC चा काऊंटर सुरुच ठेवण्याबाबत निर्णय झाला. GTDC ने लागू केलेले अतिरिक्त २०० रुपये शुल्क मागे घेण्याचा देखील निर्णय झाला.

भविष्यात GTDC, गोवा वन विकास महामंडळ आणि जीप ऑपरेटर्स असोसिएशन यांच्यात संयुक्त करार होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी बैठकीनंतर दिली.

दूधसागरला जाणाऱ्या पर्यटकांना काय काळजी घ्यावी लागणार?

दूधसागर ट्रेकिंग करण्यासाठी पर्यटकांना पूर्वनोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. नोंदणीवेळी पर्यटकांना विविध शुल्क मिळून ५०० रुपये देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात

नेचर गाईड - २०० रुपये,

GTDC शुल्क १५० (अधिक १८ टक्के जीएसटी),

GFDC शुल्क ५० रुपये

आणि वन प्रवेश शुल्क १०० रुपये

असे ५०० रुपये मोजावे लागतात. यातील दोनशे रुपये आता कमी होणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नोंदणी अद्याप बंधनकारकच असणार आहे. दूधसागर ट्रेकिंगसाठी येथे नोंदणी करता येईल.

पर्यटकांना काय काळजी घ्यावी लागणार

१) दूधसागर ट्रेकिंगला जाणाऱ्या पर्यटकांना ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे.

२) दूधसागर परिसरात मद्य घेऊन जाण्यास बंदी आहे.

३) एक नेचर गाईडसोबत जास्तीत जास्त दहा पर्यटकांना जाण्यास परवानगी आहे.

४) कुळे येथील वनविभागाचे अधिकारी पर्यटकांना अधिकची माहिती आणि सूचना देतील.

५) नोंदणी रक्कम एकदा केलेल्या बुकिंगनंतर माघारी दिली जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT