कुळे : दूधसागर नदीचे पाणी पुन्हा गढूळ होऊन लाल झाल्याने ते पाणी लाल कसे होते याचा शोध घेण्यास जलस्रोत खात्याला अद्याप यश आले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हे पाणी लाल कसे होते याचा शोध त्वरित लावावा अन्यथा संबंधित खात्यावर धडक मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा दाभाळ येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
(Dudhsagar Water became muddy)
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दूधसागर नदीचे पाणी गढूळ होण्याचे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याने परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ओपा प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा विविध तालुक्यात केला जात असल्याने गढूळ पाण्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. राज्यातील खाणी बंद असूनही पावसाळ्यात दूधसागर नदीत गढूळ पाणी वाहत असल्याने स्थानिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
काले, करमणे नदीचे लाल पाणी दूधसागर नदीत मिसळत आहे. आम्हाला पाणीपुरवठा करणारा पंप नदीत बसविण्यात आला आहे. फिल्टर आहे, पण तो वारंवार बंद पडत आहे. परिणामी गढूळ पाणीपुरवठ्यामुळे आमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. संबंधित खात्याने आम्हाला शुद्ध पाणी पिण्यासाठी द्यावे. - गुरू गावकर, किर्लपालचे पंच
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.