Goa District Election : दवर्लीत भाजप, काँग्रेस, ‘आप’मध्येच लढत

तोडीस तोड उमेदवार; दोन डमीसह एकूण 10 अर्ज, निवडणूक होणार चुरशीची
Goa District Panchayat By-Election
Goa District Panchayat By-ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : जिल्हा पंचायतीसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दवर्ली मतदारसंघात यावेळी बहुरंगी लढत अपेक्षित आहे. भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्षाने तोडीस तोड उमेदवार उभे केल्याने ही लढत चुरशीची होईल अशी चिन्‍हे दिसू लागली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता मागील दोनवेळा या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी यावेळी काँग्रेस आणि ‘आप’कडून जबरदस्त आव्हान उभे केले जाण्याची शक्यता आहे. या मतदासंघातून निवडणूक लढविणारा ‘आरजी’ पक्ष आणि मुस्लिमबहुल मतदारसंघात उभे राहिलेले रुमडामळ-दवर्लीचे माजी सरपंच मुर्तझा कुकनूर हे कुणाची मते फोडणार, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

Goa District Panchayat By-Election
Goa District Panchayat By-Election : रेईश-मागूसमध्‍ये चौरंगी लढतीची शक्‍यता

उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्‍या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजपच्या डमी उमेदवारांसह एकूण 9 जणांनी अर्ज भरले. आरजीच्या वतीने अँड्र्यू रिबेलो यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. आज भाजपतर्फे दवर्ली पंचायतीचे माजी उपसरपंच परेश नाईक यांनी, काँग्रेसतर्फे लियोन रायकर यांनी तर ‘आप’च्या वतीने आके-बायशचे माजी सरपंच सिद्धेश भगत यांनी अर्ज भरले.

भाजपचा डमी उमेदवार म्हणून कपिल देसाई तर काँग्रेसचा डमी उमेदवार म्हणून मायरा रोषा यांनी उमेदवारी अर्ज भरले. शिवाय आपक्ष म्हणून मुर्तुझा कुकणुर, सुनीता (पूजा) नाईक, भगवान रेडकर व जुझे डायस यांनीही अर्ज भरले आहेत. भाजप उमेदवाराबरोबर नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर व माजी खासदार नरेंद्र सावईकर हजर होते. तर, काँग्रेस उमेदवारासोबत दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा हे उपस्थित होते.

भाजपची डोकेदुखी वाढली

सुमारे 20 हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात 8 हजार मुस्लिम मतदार आहेत आणि हेच मतदार येथे निर्णायक भूमिका वठवित आले आहेत. मागच्या दोन निवडणुकांमध्‍ये हे मुस्लिम मतदार भाजपचे उल्हास तुयेकर यांच्याबरोबर राहिल्याने त्यांचा विजय झाला.

परंतु यावेळी रूमडामळ-दवर्ली पंचायतीत सर्व मुस्‍लिम मतदारांनी दाखविलेली एकजूट आणि ‘पीएफआय’वरील कारवाई भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक लढविणारे कुकनूर यांच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून असेल. शिवाय भाजप कार्यकर्त्या सुनीता नाईक या येथे बंडखोर म्हणून उभ्या आहेत.

मात्र याचा फायदा काँग्रेसला मिळणार असेही नाही. कारण यावेळी ‘आप’ने हिंदू, मुस्‍लिम व ख्रिश्चन या तिन्ही समाजात लोकप्रिय असलेले सिद्धेश भगत यांना उमेदवारी देऊन धूर्त खेळी खेळली आहे. काँग्रेसने एसटी समाजातील लियोन रायकर यांना उमेदवारी दिली आहे. त्‍यांची डोकेदुखी वाढविली आहे ती ‘आरजी’चे उमेदवार अँड्र्यू रिबेलो यांनी. त्‍यामुळेच यावेळची लढत अत्यंत चुरशीची होणार असे संकेत मिळू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com