traffic problems Baga Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Problem: रस्त्याच्या मध्यभागी गाडी केली पार्क, तीन तास गेले पार्टीला; मद्यधुंद पर्यटकांमुळे बागा परिसरात वाहतुकीचा खोळंबा

Goa Drunk Tourists Issue: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या हडफडे-बागा रस्त्यावर शनिवारी पहाटे पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे वाहतूक कोंडी झाली

Akshata Chhatre

म्हापसा: गोवा हा नेमहीच पर्यटनासाठी प्रसिद्ध ठरलाय, देशी तसेच विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत गोव्यातील पर्यटनाचा आनंद घेतात, मात्र काहीवेळा पर्यटकांकडून केल्या गेलेल्या निष्काळजीपणामुळे स्थानिकांना बसतो. गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या हडफडे-बागा रस्त्यावर शनिवारी (१२ एप्रिल) रोजी पहाटे पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे वाहतूक कोंडी झाली.

या पर्यटकांनी आपली भाड्याची गाडी चक्क रस्त्याच्या मधोमध उभी केली आणि तीन तास बेधुंद होऊन पार्टी करत राहिले. एका स्थानिक टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातून आलेल्या या गाडीतील पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होते. सुरुवातीला स्थानिकांना गाडी बंद पडली असल्याची शंका आली मात्र जाऊन पाहताच एक भलताच प्रकार उघडकीस आला. रस्त्याच्या मधोमध गाडी पार्क करून पर्यटक पार्टी करायला गेले होते.

हे पर्यटक मोठ्या प्रमाणात मद्यधुंद अवस्थेत होते आणि अशा स्थितीत रस्त्याच्या मधोमध गाडी लावल्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलीस आणि कळंगुट पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

मद्यधुंद अवस्थेत पर्यटक काय करतात याचं भान त्यांना राहत नाही आणि स्थानिकांना याच त्रास सहन करावा लागतो असं एक टॅक्सी चालक म्हणाला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल या पर्यटकांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सुट्ट्यांच्या काळात गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढत असताना, अशा घटनांमुळे वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT